सध्या अनेज ठिकाणी जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे सुरू झाली आहेत. असे असताना IMD ने सांगितले की, पश्चिम मध्य आणि नैऋत्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये 45-55 कि.मी. प्रति तास ते 65 किमी.
तासाभरापर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. IMD नुसार 9 जुलै रोजी उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने पाऊस सक्रिय झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर असणारा पाऊस अखेर बरसणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिल्लीत कमाल तापमान केवळ 30 अंश सेल्सिअसपर्यंतच राहणार आहे.
आज या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता..
उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे.
छत्रपती कारखान्यावर मोठा राडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की...
तसेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही सांगितले आहे.
शेणाशी संबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला श्रीमंत, शेतकरी बांधवांनो जाणून घ्या..
पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करा, व्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Share your comments