Maharashtra Rain Update : पावसाची उघडिप, पण 'या' भागात जोरदार होण्याचा अंदाज
राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर सूर्य दर्शन होत ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.
राज्यात सुरु असलेल्या पावसाने आता काहीशी उसंत दिली आहे. त्यामुळे आज (दि.३१) रोजी कोकण, घाटमाथ्यावर तुरकळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
English Summary: Heavy rain is expected in the statePublished on: 31 July 2023, 10:54 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments