MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

पावसाने मुंबईला झोडपलं , पुढील तीन तास होणार मुसळधार पाऊस

गेल्या 24 तासापासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. धो- धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगराला पावसाने जोरदार झोडपले आहे. दम्यान अजून पुढील तीन तासांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


गेल्या 24 तासापासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. धो- धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगराला पावसाने जोरदार झोडपले आहे. दम्यान अजून पुढील तीन तासांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत चोवीस तासांत २०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. आजही मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील तीन तास मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते. मुंबईमध्ये परवापासून सुरु असलेल्या पावसाने आता आणखी जोर धरला आहे. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे. सोबतच मुसळधार पाऊस देखील होणार असल्याने महापालिकेने 24 विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचे पाहिला मिळाले. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपूर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता.  त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलामुळे तलाव क्षेत्रात केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. परंतु आता शुक्रवार रात्रीपासूनच तलाव क्षेत्रात देखील पावसाने आपलं खातं उघडलं आहे. मुंबईमध्ये आज तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबई मधील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी विभागात रात्रभर झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचले आहे. या कॉलनीमधील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या कॉलनीमधील काही घरात देखील पाणी भरले आहे.

English Summary: heavy rain fall in mumbai in next three hours Published on: 05 July 2020, 01:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters