
Rain News
पुणे
कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, कोकणातही पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोल्हापुरात जिल्ह्यातही पाऊस कायम असल्याने नदीपात्रातील पाणीपातळी वाढ होत आहे. राधानगरी धरणातूनही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीपात्र परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाणे मध्येही मागील तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधारेमुळे उत्तर पश्चिम उपनगरे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या काही भागात गेल्या २४ तासांत १५० ते १८५ मिमी पाऊस पडला आहे.
Share your comments