1. बातम्या

सावधान ! राज्यासह देशातील इतर भागात उष्णतेची लाट - हवामान विभाग


मे महिना संपत आला आहे, यारदम्यान तापमान कमालीचे वाढले आहे. विशेषत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. २५ आणि २६ मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, या काळात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढलेला असेल. राज्यातील हवामान उष्ण व कोरडे असल्याने उन्हाच्या झळा वाढत आहेत. विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूरात हंगमात प्रथमच तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्ण लाट आली आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरात हंगामातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली आहे. आज विदर्भातील उष्ण लाट कायम राहणार आहे. तर उर्वरित राज्यातही तापमान वाढलेले असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील जळगाव, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा येथेही तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. राज्यात आज ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चार ते पाच दिवस देशात उष्णतेची लाट राहणार आहे. 

अहवालानुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून महाराष्ट्र आणि तेलंगाणीतील काही भागांमध्ये देखील पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेशचा भाग उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेत असून या राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणा येथे येत्या ४ ते ५ दिवसांत उष्णतेची लाट पसरणार आहे. छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणीही ही लाट राहणार आहे. दिल्ली हवामान खात्याने २५ मे रोजी दिलेल्या हवामान बुलेटिनमध्ये ही बाब सांगण्यात आली आहे. विभागीय हवामाना खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी लोकांना इशारा देताना म्हटले की, “कुणीही दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर येत्या ३ ते ४ दिवसांत ओडीशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य मध्य प्रदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटकच्या उत्तर भारतात उष्णेतेची लाट लावण्यात येणार आहे.”

दरम्यान अजून मॉन्सूनने गती घेतलेली नाही. अम्फानने ओढून नेलेले बाष्प व प्रभावित केलेले वाऱ्याचे प्रवा सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनच्या अंदमानातील पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे. तर यंदा केरळात मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार असून ५ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. 

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters