1. बातम्या

ऐकलं का, या झाडाला लागतो पैसा, सरकारही देईल धन

अनेकजण स्वतःचा व्यवसाय बरा असा विचार करत आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

सध्या अनेक लोक नोकरीतील धकधकीला कंटाळले आहेत. नोकरीमध्ये होणाऱ्या बॉसच्या कटकटीऐवजी आपली नोकरी बरी, कमीच खाऊ पण घरीच खाऊ असं म्हणत अनेकजण स्वतःचा व्यवसाय बरा असा विचार करत आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत.

जर तुम्हीही तुमची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला एका व्यवसायाची कल्पना सांगणार आहोत.  तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारचे सहकार्यही मिळेल. हा व्यवसाया तमालपत्राची लागवड करण्याबाबत आहे. हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय मानला जातो. भारतातील अनेक लोक तमालपत्राची लागवड करून प्रचंड उत्पन्न मिळवू लागले आहेत. आज आपण याचविषयी जाणून घेमार आहोत.. 

हेही वाचा : e-Prime Mover: शेतकर्‍यांचा शेतीवरील खर्च होईल शून्य; जाणून घ्या सौरऊर्जावरील यंत्राची माहिती

तमालपत्राची लागवड करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. त्याचवेळी, जेव्हा त्याचे रोप वाढू लागते, त्याचप्रकारे, मेहनत देखील कमी होऊ लागते. एकदा झाड मोठे झाले की, तुम्हाला झाडाची काळजी घेणे आवश्यक आहे. तमालपत्राच्या लागवडीसाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तुम्हाला 30 टक्के अनुदान देखील मिळत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला या व्यवसायात सरकारची मदत मिळू शकेल.

 

तमालपत्राच्या रोपाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला वार्षिक 5 हजार रुपये कमावण्याची संधी मिळते. जर तुम्ही त्याची 25 झाडे लावत असाल तर तुम्हाला एका वर्षात 75 ते 1 लाख 25 हजार रुपये सहज कमावण्याची संधी मिळते. बाजारात तमालपत्राला नेहमीच मागणी असते. अशा परिस्थितीत, लागवड केल्यानंतर, तुम्हाला भरपूर पैसे कमविण्याची संधी मिळत आहे.

English Summary: Heard, this tree gives money, the government will also give money Published on: 07 April 2022, 07:28 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters