1. यांत्रिकीकरण

e-Prime Mover: शेतकर्‍यांचा शेतीवरील खर्च होईल शून्य; जाणून घ्या सौरऊर्जावरील यंत्राची माहिती

केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ (Central Institute of Agricultural Engineering, Bhopal) शास्त्रज्ञांनी सौरऊर्जेवर चालणारे ई-प्राइम मूव्हर उपकरण विकसित केले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
e-Prime Mover file Photo

e-Prime Mover file Photo

कृषी क्षेत्रातील दैनंदिन कामाची कृषी उपकरणांसंर्भात (Agriculture Machinery) नवनवीन घडामोडी घडत आहेत. दरम्यान, प्रदूषणानांचा सर्वांना त्रास होत असतो, त्यामुळे प्रदूषणावर मात करण्यासाठी, इलेक्ट्रिक आणि सौर उर्जेवर चालणारी उपकरणे तयार केली जात आहेत. (Electric or Solar Powered Equipment) आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा कृषी उपकरणाबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहेत शिवाय ते यंत्रे शेतीवरील खर्चदेखील कमी करतील.

सध्याची परिस्थिती पाहता इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. कमी खर्चात शेतीची कामेदेखील होणं शक्य नाही, शिवाय डिझेल पेट्रोल, रॉकेलमुळे वायू प्रदूषण होत असते. यावर पर्याय म्हणून भोपाळमधील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सौरऊर्जेवर चालणारे यंत्र बनवले आहे.

शेतात क्रांती घडवून आणेल ई-प्राइम मूव्हर मशीन (e-Prime Mover Machine)

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ (Central Institute of Agricultural Engineering, Bhopal) शास्त्रज्ञांनी सौरऊर्जेवर चालणारे ई-प्राइम मूव्हर उपकरण विकसित केले आहे. (e-Prime Mover Machine) डॉ.मनोजकुमार त्रिपाठी यांनी हे साधन बनवले आहे.

ई-प्राइम मूव्हर डिव्हाइस (e-Prime Mover Device) यामुळे शेतकऱ्यांच्या इंधनाची बचत होण्यास मदत होईलच, त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठीही हे एक उत्तम पाऊल आहे. या उपकरणाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना तण काढणे, रोप लावणे या कामासाठी तसेच औषध फवारणीसाठी कोणत्याही इंधनाची गरज भासत नाही. हे फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवर चालेल ज्यामुळे याची विशेषता आणखी वाढते.

 

ई-प्राइम मूव्हर मशीनची वैशिष्ट्ये (Features of E-Prime Mover Machine)

  • e-Prime Mover Machine हे सौरऊर्जेवर चालणारे यंत्र आहे, ज्याच्या मदतीने शेतकरी दीड एकर जमिनीवर अवघ्या एका तासात औषध फवारणी करू शकतील.
  • या यंत्राच्या साहाय्याने एकाच जमिनीची नांगरणी, खुरपणी ही कामे पाच तासांपेक्षा कमी वेळेत करता येईल. शिवाय इंधनाचा खर्चही होणार नाही.
  • e-Prime Mover Machine एकदा पूर्ण चार्ज केली तर डिव्हाइसची बॅटरी तीन तास कार्यरत असते. याशिवाय सौरऊर्जेवर चार्ज होणाऱ्या बॅटरीने शेतकरी घरात लाईट देखील लावू शकतात.
  • हे उपकरण धान्य वाहतूक करण्यासाठी वापरले जाते (Transport for Grains)
  • याशिवाय संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सीएनजी इंजिनही विकसित केले आहे. (CNG Engine) भी बनाया है, जे ट्रॅक्टरमध्ये लावल्यानंतर शेतीचा खर्च कमी होऊ शकतो.

शेतीची कामे लवकर कराल (Machine that do Farm Works Quickly)

खुरपणी, कुंडी, नांगरणी याशिवाय या कृषी यंत्राचा उपयोग औषध फवारणीसाठीही करता येतो. एक तासात दीड एकर क्षेत्रावर औषध फवारणी या यंत्राने करता येते.

हेही वाचा : विहीर मोटार अनुदान योजना अनेकांना मिळाला लाभ करा ऑनलाईन अर्ज

विजेचा वापर कमी होईल (Reduce Power Consumption)

याशिवाय या कृषी यंत्राच्या बॅटरीचा वापर करून शेतकरी आपल्या घरात लाईटही लावू शकतात. तसेच ही बॅटरी दुसरीकडे वाहून नेता येते. ज्यामुळे शेतकऱ्याच्या श्रमाची बचत होईल. हे यंत्र बॅटरी क्षमतेसह, 2 क्विंटलपर्यंतचा भार सहज उचलू शकते.

 

सीएनजी इंजिनमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार (CNG Engine For Save Farmers Expenses)

विशेष म्हणजे येथील शास्त्रज्ञांनी ट्रॅक्टरसाठी सीएनजी इंजिन तयार केले आहे. डिझेल इंधन बदलून सीएनजी इंजिन वापरून शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरमधील इंधनाची बचत करू शकतात तसेच त्यांचा खर्च निम्मा करू शकतात. त्यामुळे शेतीचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल.

English Summary: e-Prime Mover: Farmers will have zero expenditure on agriculture; Learn about solar powered devices Published on: 06 April 2022, 09:22 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters