आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. काल पहाटे एकादशीनिमित्त नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपल्या चार पिढ्यांसोबत पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई येथील शेतकरी दाम्पत्यांनी पंढरपुरात रविवारी पहाटे विठ्ठलाची महापूजा केली. यावर प्रतिक्रिया देताना 'आमचे जीवन धन्य झाल्याची' भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मुरली बबन नवले व जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य १९८७ पासून ते पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करत आहेत. मुरलीधर नवले हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना पहिल्यांदाच महापूजेचा मान मिळाला आहे. त्यांनी २०१२ पासून पायी वारी केली. नंतर गेली २३ वर्षं बसप्रवासाने त्यांनी दिंडी केली. दोन भावंडे, एक बहीण, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
त्यांचा एक मुलगा पुण्यात कामास असून दुसरा मुलगा आपल्या वडिलांना शेतामध्ये हातभार लावत आहे. नवले कुटुंबीयांनी या वर्षी शेतात रेशीम उद्योग उभारला आहे. आपल्या या उद्योगातून आणि शेतीतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतकरी मुरली नवले हे पहिल्यापासूनच धार्मिक वृत्तीचे आहेत. गावच्या सप्ताहात ते भजन, काकडा, हरिपाठ नित्यनेमाने करतात. विठ्ठलाचे भजन आणि मनापासून त्याचे पूजन करणे हीच त्यांची आवड आहे.
इतकी वर्षे न चुकता ते वारी मध्ये सामील होत आहेत. इतक्या वर्षांचे फळ म्हणून की काय त्यांना यावर्षी विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. ते मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी ठरले आहेत. नवले कुटूंबियांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पहिल्यांदाच पंढरपूर येथे गेवराई तालुक्याला हा मान मिळाला आहे.
लाकडी- निंबोडी योजनेला कायमस्वरूपी बंदी? मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत पासचे वितरण
मानाचे वारकरी ठरलेल्या नवले दाम्पत्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी मोफत एसटी पासचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिर ट्र्स्टचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना 1 जुलैला 50 हजार मिळणार होते, सरकार बदलले आणि सगळा घोळच झाला..
Tata Motors: Tata Motors ने रचला नवा विक्रम; "या" पाच कारची सर्वांधिक विक्री..
Share your comments