केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. कधी नव्हे ते ५० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच केळीला विश्व विक्रमी भाव मिळाला आहे. प्रतिक्विंटल १ हजार ६०० ते १ हजार ७०० रुपये भाव आहे तर चिल्लरमध्ये ६० ते ७० रुपये डझनप्रमाणे केळी विकली जात आहे. केळीचे उत्पादन घटल्यामुळे आवक कमी झाली. आणि बाजारात केळीने उच्चाकी दर गाठले. यामुळे यंदा केळी उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
यंदा अति तापमानामुळे केळीच्या बागा तयार होण्यास बराच वेळ लागला. अजूनही केळी बागीचे काम आटोपले नाही. कापणीचे काम अजूनही झाले नाही. मोजक्याच शेतकऱ्यांच्या केळी बागांच्या कापणीचे काम झाले आहे. त्यामुळे बाजारात केळीच्या मालाचा पुरवठा कमी झाला आहे. आणि मार्केटच्या सूत्रानुसार आवक घटली की किमतीत वाढ होते. सध्या बाजारात केळीला बरीच मागणी आहे. मात्र केळीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे केळीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात केळीच्या बागा कटनीवर येतात. त्यामुळे आवक भरपूर असते आणि बाजारात त्यामुळे भावही कमी असतात. मात्र यावेळेस केळीच्या भावात एकाकी प्रचंड वाढ झाली आहे. उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, ५० वर्षात याआधी कधीच एवढा भाव नव्हता. मात्र याचा फायदा काहीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
विदर्भावर विजेचे संकट; एकाच दिवशी घेतला आठ शेतकऱ्यांचा बळी
विदर्भातील मोजक्याच जिल्ह्यात केळीच्या बागा आहेत आणि त्यातही निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागांचे बरेच नुकसान झाले आहे. हे दर असेच राहिले तर केळी उत्पादकांना याचा बराच फायदा होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या:
अतिवृष्टीमुळे तब्बल २२० पशु दगावले; शेतकरी चिंतेत
शेतकरी आणि अस्वलाची कडवी झुंज; दोघेही रक्तबंबाळ होऊन...
Share your comments