अनेक शेतकऱ्यांचे उसाची एफआरपीची अनेक कारखान्यांनी दिले नाहीत. यामुळे सध्या शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापुरातील इंद्रेश्वर साखर कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून ऊसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
एफआरपी द्या अन्यथा कारखान्याला टाळं ठोकणार, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच उसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतापले आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहेत. यातच अनेक कारखाने हे शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत. यामुळे पुढील पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावच्या हद्दीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्याने गाळप केलेल्या उसाची एफआरपी पाच महिने उलटूनही अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या संयमाचा कडेलोट झाला. यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
Mohit kamboj: बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु, आता रोहित पवार अडचणीत येणार?
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
Share your comments