राज्यात अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हताश झाला आहे. तर बीड जिल्ह्यातही गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आहे. अशा परिस्थिती देखील बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. यासाठी जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन देखील करण्यात आलं.
पालकमंत्री अतुल सावे यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 51 रुपयांचं बक्षीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना शोधून देणाऱ्या व्यक्तीला 51 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. गेल्या पाच दिवसांपासून बीड मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अमाप नुकसान झालं होत. पशुपालकांचे देखील न भरून निघणार नुकसान झालं. मात्र इतकी बिकट अवस्था असताना देखील पालक मंत्री अतुल सावे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले नाहीत.
त्यामुळे काल महाराष्ट्र दिनानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी अतुल सावेंची भेट घेऊन चांगलाच समाचार घेतला आहे. अतुल सावे हे बीड दौऱ्यावर असताना शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी 'बीडच्या शेतकऱ्यांना माहित नव्हतं पालकमंत्री गोरे आहेत की काळे, पण आज कळलं' अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे.
पीएम किसान संदर्भात कृषीमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, 14 व्या हप्त्यापूर्वी आले हे अपडेट!
पूजा मोरे यांनी अतुल सावे यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणीही केली आहे.
पूजा मोरे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पूजा मोरे आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना काल सकाळपासूनच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना देखील पालक मंत्री अतुल सावे यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. आता या आंदोलनानंतर तरी शेतकऱ्यांना मदत मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाची बातमी! पीएम किसानवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Share your comments