1. बातम्या

आपत्कालीन भारनियमनाचे संकट: विजेची मागणी प्रचंड वाढली, महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये सध्या कोळसा टंचाई

सध्या मार्च महिन्यातच एवढी उन्हाची तीव्रता वाढली आहे की असह्य असा उकाडा जाणवत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
loadsheding maybe start in loadsheding

loadsheding maybe start in loadsheding

सध्या मार्च महिन्यातच एवढी उन्हाची तीव्रता वाढली आहे की असह्य असा उकाडा जाणवत आहे.

राज्यातील महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये सध्या कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील घरगुती व वीज वापराच्या एफ, जी,  जी 1, जी 2, आणि ही या पाच ग्रुपमधील फिडरवर मंगळवारी एका तासाच्या आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. याचा परिणाम कृषी वीज पुरवठ्यावर सुद्धा झाला त्यामुळे कृषी फीडरला आठ ऐवजी केवळ पाच तासांचा वीजपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे हे भारनियमन करताना महावितरणने नवीन कुठल्याही प्रकारचा आदेश न काढता सहा वर्षांपूर्वीच्या जुन्या आदेशानुसारच भारनियमन केले. या पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई अशीच राहिली तर येणाऱ्या आठवड्यात राज्यात लोडशेडिंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस च्या वरती असल्याने विजेच्या मागणीत खूप वाढ झाली.

नक्की वाचा:मिशन सेंद्रिय शेती: सेंद्रिय शेतीला भर देण्यासाठी पन्नास हजारांची मदत आणि होत आहे योजनांचाही लाभ, वाचा सविस्तर

मागच्या वर्षीच्या तुलनेत3540 मेगावॅटचे अधिक वाढ नोंदविण्यात आली. अजून तर उन्हाळ्याचे एप्रिल आणि मे हे दोन महत्त्वाचे महिने यायचेबाकी आहेत. या कालावधीत तर विजेची मागणी ऐतिहासिक पातळीवर नोंदवली जाऊ शकते.

 एप्रिल आणि मे महिन्यात बनू शकतो प्रश्न गंभीर

 जर बुधवारचा विचार केला तर महावितरणची विजेचे मागणीही 24 हजार 340 मेगावॅट होती व राज्याची मागणी 27568 मेगावॅट होती. जर आपण वीज पुरवठ्याच्या बाबतीत विचार केला तर महानिर्मिती कडून महावितरणला सर्वात जास्त वीज पुरवठा केला जातो. त्यातच राज्यामध्ये महावितरणची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता दहा हजार 107 मेगावॅट आहे. परंतु कोळशाची टंचाई निर्माण झाल्यामुळे बुधवारी केवळ सहा हजार सहाशे नऊ मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकली. त्यामुळे  महानिर्मितीच्या गॅस, हायड्रो, सोलर व खाजगी क्षेत्रातून वीजपुरवठा करून गरज भागवली जात आहे. यामध्ये येणाऱ्या एप्रिल व मे महिन्यात विजेची मागणी वाढून कोळसा टंचाई कायम राहिल्यास लोडशेडिंग वाढीचे संकेत आहेत.

नक्की वाचा:पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने देखील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढ

राज्यातील हे संच बंद

1- भुसावळ येथील 210 मेगावॅटचा संच क्रमांक 3 बंद आहे.

2- परळी येथील संच क्रमांक सहा बंद आहे.

3- चंद्रपूर येथील 500 मेगावॅट युनिट क्रमांक सहा कोळसा पुरवठा चा रोपवे बिघाडाने बंद आहे.

4- नाशिकचा 210 मेगावॅटचा संच क्रमांक चार टेक्निकल कारणामुळे बंद आहे. ( संदर्भ- दिव्य मराठी)

English Summary: growth demand of electricity in maharashtra and loadsheding may be start Published on: 31 March 2022, 10:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters