1. बातम्या

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने देखील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात केली वाढ

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
maharashtra goverment take decision about DA

maharashtra goverment take decision about DA

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे.

. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये  वाढ करण्याचा निर्णय घेतला केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारने देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

नक्की वाचा:नोकरीच टेन्शन हवेतच विरणार!! शेतकरी पुत्रांनो 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला सधन

इतकेच नाहीतर 21 जुलै 2021 पासून हा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून मार्चच्या पगारामध्ये तो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के इतका डीए मिळणार आहे. आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील 2022 पासून नवीन महागाई भत्ता प्रमाणे पगार मिळणार आहे.

नक्की वाचा:उन्हाळी आवर्तनाबाबत कालवा समितीचा निर्णय; इंदापूर, बारामती, फलटण, खंडाळा, पंढरपूरमधील शेतकऱ्यांना दोन आवर्तने

राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या  जीआर नुसार एक जुलै 2021 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे व मार्च 2022 च्या पगारा सोबत ही फरकाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने दोन महागाई भत्त्याच्या संदर्भात शासन निर्णय जारी केली असून त्यानुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी होती ती देण्यात येणार आहे. 

तसेच या मार्चपासून महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.

English Summary: good news for state goverment employee growth in da Published on: 31 March 2022, 08:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters