उन्हाळी हंगाम 2021-22 या साठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानमध्ये भुईमूग बियाणे करता ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर बियाणे विक्री महाबीज अकोला यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यासाठी विक्रेते व उप विक्रेत्या मार्फत सुरू होत आहे.
या योजनेअंतर्गत भुईमूग पिकाच्या टॅग 24 या वाणाचे बियाणे उपलब्ध आहे.भुईमूग बियाण्याची 20 किलो ची बॅग ची मूळ किंमत 3300 रुपये असून त्यावर अनुदान म्हणून एक हजार 400 रुपये प्रति बॅग देण्यात येणार आहे. अनुदानित किंमत 1900 रुपये प्रति बॅग आहे.
बुलढाणा जिल्ह्यासाठी भुईमूग पिकाची एक हजार क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्तालय कडूनप्राप्त झालेले आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या मात्रे मधून एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादित 40 किलोपर्यंत बियाणे अनुदान मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 28 जानेवारीपर्यंत महाडीबीटी पोर्टल मार्फत ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.
महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड पत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध होणार आहे.असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक यांनी सांगितले नाईक यांनी सांगितले.
Share your comments