गडचिरोली : कधी अवकाळी पाऊस, तर कधी अति तापमान अशा एक ना अनेक समस्यांमुळे शेतकरी बंधूंचे सगळे पूर्वनियोजन विस्कटले आहे. हा सगळा अडचणींचा डोंगर पार करून शेतकरी बंधूनी आपल्या शेतीची कामे पार पाडली. यंदा राज्यात धान खरेदी केंद्राला सुरवात होण्यास विलंब झाला आहे. धान खरेदी केंद्र उशिरा का होईना सुरु झाले असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या काही मिटल्या नाहीत.
विदर्भात धान पिकाची काढणी होऊन बरेच दिवस झाले मात्र तरीही खरेदी केंद्र सुरु झाली नव्हती. याबाबतच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या, धान पिकांचे होणारे नुकसान पाहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये उशिरा का होईना धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच धानाची अधिक प्रमाणात खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
असं असलं तरी मुख्य मागण्या या प्रलंबित असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात, एकरी 9 क्विंटल धानाची खरेदी ऐवजी आता त्या बदल्यात एकरी 14 क्विंटलची खरेदी होणार असल्याचे आदेश आदिवासी विकास महामंडाळाने जारी केले आहेत.
Mansoon: मान्सूनबाबत हवामान विभागाचा नवीन अंदाज आला, वाचा काय म्हटलं हवामान विभागानं
जाणून घ्या आदिवासी महामंडळाचा नियम
प्रत्येक शेतकऱ्याचे धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणले जावे या हेतूने प्रति एकर 9 क्विंटल याप्रमाणेच खरेदी केली जात होती. यासाठी काही महत्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या. त्यात सात बारा उताऱ्यावरील नोंदी पाहूनच धान खरेदी करण्यात येत असे. गेले काही वर्षे हाच नियम गडचिरोलीमधील शेतकऱ्यांसाठी लागू होता. या जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्येही याच नियमांप्रमाणे सर्वकाही चालू होते. परंतु वाढते उत्पादन तसेच खरेदीअभावी होत असलेले नुकसान यामुळेनियमात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला मान्यता
यंदा धान उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. असं असलं तरी खरेदी केंद्रावर कोणतेच बदल करण्यात आले नाही. नियमाप्रमाणे 9 क्विंटलची खरेदी हे ठरलेलेच होते. त्यामुळे अतिरिक्त धानाचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी यावर आवाज उठवत आंदोलन, मोर्चे काढून सरकारचा निषेध केला. दरम्यान
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरील धान खरेदीच्या मुदतीमध्ये वाढ करावी यासाठी चक्का जाम आंदोलनदेखील केले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे. अखेर गडचिरोली जिल्ह्यात आता एकरी 14 क्विंटल धान खरेदी केले जात आहे.
हेक्टरी धान खरेदीमध्ये वाढ करण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी केवळ धान खरेदी केंद्रावरच अवलंबून आहेत. आंदोलनामुळे आता सध्या एकरी 14 क्विंटल धान खरेदी केली जात आहे मात्र
हेक्टरी 43 क्विंटलची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता अवघडच झालं! म्हशीच्या खऱ्या मालकाला शोधण्यासाठी दिले DNA चाचणीचे आदेश
कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? वर्षा गायकवाड यांचे मोठे वक्तव्य..
Share your comments