नवी दिल्ली, केंद्र सरकारच्या सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वाची योजना आहे. याचा दरवर्षी अनेकजण लाभ घेतो. आता योजनेच्या PM Awas Yojana लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या विशेष योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
आता घरे बांधण्याचा खर्च वाढल्याचे समितीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता रक्कमही वाढवायला हवी. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर, लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून ही रक्कम वाढवली नव्हती. यामुळे पैसे कमी पडत होते. झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याची शिफारस केली होती.
असे सरताना या समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे आता अनेकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
PM Awas Yojana पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता येतील आणि लोक त्यासाठी पुढे येतील. अशी मागणी अनेकांची होती. यामुळे आता अनेकांना याचा फायदा होणार आहे. हे पैसे किती टप्प्यात येणार हे देखील लवकरच समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना वीज बिल माफी!! अर्थसंकल्पात योगी सरकारची मोठी घोषणा..
शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलय? युरियाचे पाणी टाकल्याने चाळीतील कांदा नासला
शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना! डिझेलचे भाव कमी, मात्र नांगरटीचे दर वाढवले..
Share your comments