
chandrakant patil
गेल्या दोन वर्षांपूर्वी जो काही कोरोना महामारीचा उद्रेक सगळीकडे झाला यामध्ये बऱ्याच लोकांना आपला प्राण गमावला. अशा व्यक्तींमध्ये बरेच जण हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते, अशा व्यक्तींनी प्राण गमावल्यामुळे कुटुंबावर असलेली छत्रछाया यामुळे हरवली व संपूर्ण कुटुंब अक्षरशा उघड्यावर पडल्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली.
या गोष्टीचा परिणाम हा बऱ्याच मुलांच्या शिक्षणावर होण्याची देखील भिती व्यक्त केली जात असतानाच कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षणाचे पूर्णपणे मोफत म्हणजे संपूर्ण शुल्क माफ होणार
असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या आई आणि वडील म्हणजे दोन्ही पालक यांचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदवीत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत जे जे काही शुल्क लागेल ते संपूर्ण माफ करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळेल अशी देखील माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामध्ये चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले असून यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कोरोनामुळे पालक गमावल्याने अनाथ मुलामुलींना शिक्षण घेता यावे त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण पदवी आणि पदविका शिक्षणाची संपूर्ण फी सरकार भरणार असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा विधानसभेचे पावसाळी अधिवेशनात केली आहे.
Share your comments