औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे या ना त्या विधानामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ.गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं विधान राज्यपालांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
आज औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी नव विधान केलं आहे.
शरद पवार अत्यंत भावूक..! काय घडलं असं... जाणून घ्या
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, 'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो.
पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.
खुशखबर! जुन्या पेन्शन स्कीम पुन्हा सुरु; सरकारचा मोठा निर्णय
'तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे.
दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही' असंही राज्यपाल म्हणाले.
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 26 नोव्हेंबरला सरकार विरोधात राज्यभर आंदोलन
Share your comments