शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयन्त्न करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यामुळे आता शेती व्यवसयालाच नाही तर त्याच्या जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम (Central Government) केंद्र सरकारने केले आहे. शेतीशी अनेक निगडित क्षेत्र आहेत. या क्षेत्राचा विकास केला तर त्याचा फायदा होऊन शेतकरी सक्षम होऊ शकतो.
सरकारने आता मत्स्यव्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. त्याचबरोबर उत्तम आहार देखील मिळणार आहे. यंदाच्या (Budget) अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतही 44 टक्के वाढ करण्यात आली आहे. आधुनिक डेअरी फार्ममधून मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची योजना आहे.
हेही वाचा : सोयाबीनला उच्चांकी भाव; शेतकरी सुखावला
शेतकऱ्यांनो पारंपरिक शेती सोडा आणि करा जेरेनियमची लागवड; डोळे झाकून कमवा ५ लाख
देशातील 80 कोटी शेतकरी पशुपालनाशी संबंधित आहेत. या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात वाढ होणार आहे शिवाय कामही सुखकर होणार आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पात 20 टक्के निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशी गायींची संख्या, उत्पादकता आणि दूध उत्पादन वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ऊस पेटवून देण्याची वेळ; कोण उठलंय शेतकऱ्यांच्या मुळावर?
मोफत लसीकरणाची व्यवस्था
पशुधनाच्या आरोग्यासाठीही यंत्रणा उभारण्यात आली आहे. याच कारणामुळे पशुधन आरोग्य आणि रोगाच्या बजेटमध्ये 60 टक्के वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुधन वाचवणे, मोफत लसीकरणाची व्यवस्था करणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनावरांमधील आजाराची ओळख करून देण्याची क्षमता विकसित करणे यासारखे प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत.
रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे तरुणांच्या हाताला कामही मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा तरुणांनाच करता येणार आहे.
Share your comments