केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीक कर्जावर देण्यात येणारे व जिल्हा बँकांना प्राप्त होणारे दोन टक्के व्याज परतावा अनुदान आर्थिक वर्ष 2022-23 पासून बंद करण्यात आले आहे त्यामुळे जिल्हा बँकांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त व्याज सवलत तीवर राज्यातील जिल्हा बँकांकडून वेळेवर पीक कर्जाची शेतकरी परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी तीन लाख व त्यापुढील ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने देण्याचा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडून 29 मार्च रोजी परिपत्रक जारी केले असून त्यानुसार ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. प्राथमिक शेती संस्थांचे थेट सभासदांना जिल्हा बँकेमार्फत तीन लाख रुपयांपर्यंत सवलतीच्या व्याजदरानेकर्ज पुरवठा करण्यात येत आहे.
बँक सवलतीच्या व्याजदराने कर्जपुरवठा करीत असल्याने केंद्र सरकार दोन टक्के आणि राज्य सरकारकडून अडीच टक्के व्याज परतावा अनुदान जिल्हा बँकांना मिळत होते त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन 2021-22 या वर्षात वेळेवर पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांना तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर तसेच त्या पुढील पाच लाखापर्यंत केलेल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या सभासदांना शून्य टक्के व्याजदराची योजना चालू केलेली होती.
जिल्हा बँकांवर पडणार 2% याप्रमाणे भार
यासंबंधीच्या नाबार्डच्या पत्रान्वये सरकारकडून बँकेत प्राप्त होणारे दोन टक्के व्याज परतावा अनुदान सन 2022-23 पासून बंद केले असल्याबाबत बँकांना कळविण्यात आले आहे त्यामुळे या दोन टक्के व्याजाची रक्कम विकास सहकारी संस्था, सभासद शेतकऱ्यांना लागू केल्यास सभासदांना दर साल दर शेकडा आठ टक्के व्याज दर लागू होईल
त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार मार्फत मिळणारी प्रत्येकी तीन टक्के व्याज सवलत मिळण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. जिल्हा बँका व दोन टक्के याप्रमाणे भार पडणार आहे. केंद्र सरकारने दोन टक्के व्याज परतावा योजना बंद केल्याने बँकेचा निधी उभारण्याचा खर्च व
पीक कर्जावर मिळणारे उत्पन्न याचा विचार करता यामध्ये प्रचंड तफावत येत असल्याचे निदर्शनास येत आहे.(स्रोत-पुढारी)
महत्त्वाच्या बातम्या
नक्की वाचा:उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Share your comments