गेल्या अनेक वर्षांपासून महागाईचा विकास भरमसाठ होत आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे तर दुसरीकडे सिमेंट लोखंड यांसारख्या गृहनिर्माणासाठी आवश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच गुहा निर्माण करण्याचा खर्च वाढला आहे. याचा फटका शेतकरी बांधवांना देखील बसत आहे. शेतकरी बांधवांना आवश्यक कांदा चाळ, शेड, गाईचा गोठा इत्यादी भरण्यासाठी आता अधिक खर्च येऊ लागला आहे. यामुळे सर्वात जास्त कांदा चाळ उभारण्यासाठी खर्च येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीची नितांत आवश्यकता असते. कांद्याच्या दरात सातत्याने लहरीपणा येत असल्याने शेतकरी बांधवांना अनेकदा कांद्याची साठवणूक करावी लागते. यासाठी शेतकरी बांधवांना कांदा चाल आवश्यक असते. मात्र कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकरी बांधवांना लाखोंचा खर्च करणे अशक्य असते. यासाठी मायबाप शासनाने अनुदान स्वरूपात कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकरी बांधवांना आर्थिक मदत जारी केली आहे.
असे असले तरी आता कांदा चाळ उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण असे की, गेल्या अनेक वर्षांपासून कांदा चाळ अनुदानात वाढ झालेली नाही मात्र कांदाचाळ उभारणी साठी आवश्यक खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेले कांदा चाळीसाठी अनुदान अतिशय शुल्लक असून सदर अनुदानात कांदाचाळ उभारणी करणे जवळपास अशक्यच आहे.
कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या कांदाचाळ उभारणी अनुदानसाठी राज्यातील अनेक शेतकरी अर्ज करत असतात. यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांची निवड कृषी विभागाकडून केली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 25 टन क्षमता असलेल्या कांदा चाळ उभारण्यासाठी कृषी विभागाकडून 87 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र सध्या इंधनाच्या दरापासून ते सिमेंट,वाळू,लोखंड,पत्रे त्यांचे दर भरमसाठ वाढत असल्याने एवढ्याशा अनुदानात कांदाचाळ उभारणी जवळपास अशक्य आहे.
कांदा चाळ उभारणीसाठी आवश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे मात्र, कांदा चाळ अनुदान जैसे थे वैसेचं ठेवण्यात आले आहे यामुळे कांदाचाळ उभारणी खूपच कमी झाली आहे. एकंदरीत कांदाचाळ उभारणी साठी लाखोंचा खर्च करावा लागत आहे तर कांदा चाळ साठी अनुदान मात्र हजारोंच्या घरात आहे यामुळे कांदा चाळ उभारणीसाठी मायबाप शासनाने अनुदानात भरघोस वाढ करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Share your comments