शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर

11 November 2020 12:01 PM


एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. शासनाकडून एसटीसाठी १ हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 


टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे,” असेही परब यांनी नमूद केले.

government ST st transport एसटी महामंडळ एसटी Transport Minister Anil Parab परिवहन मंत्री अनिल परब
English Summary: Government announces Rs 1,000 crore package for ST

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.