महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफी केली होती. यामध्ये जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट उद्भवल्या मुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लावण्यात आल्याने सगळीकडे मंदीचे सावट पसरले होते.
त्यामुळे शेतकरी बांधवांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम देता येणे शक्य झाले नव्हते. परंतु त्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा पुन्हा उठवला गेला व
यादरम्यान राज्यांमध्ये सत्ता बदल झाला व सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट व भाजप यांच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय तसाच ठेवला आणि आता अंमलबजावणी केली जात आहे.
50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानच्या याद्या आल्या
जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून जवळजवळ महाराष्ट्रातील 28 लाख नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहेत.
बँकांनी ज्या काही शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या होत्या त्यांची छाननी झाली असून प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम यादया आता प्रकाशित होऊ लागले आहेत.
पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याद्या
यामध्ये राज्यातील ज्या काही जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्या बँकेच्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांच्या याद्या आल्या असून इतर राष्ट्रीयकृत बँका तसेच ग्रामीण बँकाच्या याद्या नंतरच्या टप्प्यात येणार असल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कुठे पाहता येणार?
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे शेतकरी खातेदार आहेत असे शेतकरी बांधव प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत नाव आहे की नाही हे आता पाहू शकणार आहेत. तसेच शेतकरी बांधवांना कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अर्थात सीएससी पोर्टलवर देखील यादी पाहता येणार आहे.
परंतु सीएससी पोर्टलचा आयडी ज्या व्यक्तींकडे आहे अशी व्यक्तीच सीएससी पोर्टलला यादी पाहू शकणार आहेत. म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर चालवणाऱ्या व्यक्तींना या याद्या पाहता येणे शक्य होणार आहे. ज्या व्यक्तींकडे सीएससी पोर्टल लॉगिन आयडी आहे अशा लोकांना सीएससी पोर्टलला भेट देऊन प्रोत्साहनपर अनुदानच्या याद्या पाहता येणार आहेत.
सीएससी पोर्टलला कशा पद्धतीने बघाव्यात याद्या?
जर तुमच्याकडे सीएससी पोर्टलचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही सीएससी पोर्टल ला भेट देऊन सर्च मध्ये karj असे टाइप करावे. त्यानंतर त्या ठिकाणी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची एक लिंक दिसेल व या लिंक ला क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत साईट वर तुम्हाला नेले जाईल. त्या पोर्टलवर जेव्हा तुम्ही याल त्याच्या डाव्या साईडला लाभार्थी यादी म्हणजेच आधार अथेंतिकेशन लिस्ट या पर्यायावर जावे.
त्यानंतर सीएससी आयडी ज्या जिल्ह्याचा असेल त्या जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर उघडते. यामधील व्हिलेज लिस्ट मध्ये संबंधित जिल्ह्यातील सर्व गावांची यादी तुमच्यासमोर ओपन होणार आहे.
त्यानंतर तुम्हाला ज्या गावाची प्रोत्साहनपर अनुदानाची पात्र शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करायचे आहे, यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता व यादीत तुमचे नाव शोधू शकता.
माहितीमध्ये काही समस्या असेल त्या ठिकाणी तक्रार करा
यादी डाऊनलोड केल्यानंतर यादीमध्ये जी काही माहिती देण्यात आली आहे ते बरोबर आहे की चूक याची खातरजमा करा. खातरजमा केल्यानंतर जर माहितीमध्ये काही तफावत आढळल्यास तुम्हाला बँकेत जाऊन ऑब्जेक्शन नोंदवावे लागणार आहे.
जर संबंधित यादीमध्ये तुमची माहिती बरोबर असेल तर ताबडतोब केवायसी करावी लागणार असून केवायसी करण्यासाठी संबंधित बँक शाखेत जाऊ शकता किंवा सीएससी सेंटरला भेट देऊन देखील केवायसी करता येणार आहे.
Share your comments