1. सरकारी योजना

Investment Tips: शेतकरी बंधूंनो! लेकींचा आर्थिक भविष्यकाळ करा सुरक्षित,'या' चार योजना ठरतील महत्त्वपूर्ण

जर आपण गुंतवणूक योजनांचा विचार केला तर अनेक प्रकारच्या योजना सध्या आहेत. गुंतवणूक योजनांच्या बाबतीत केलेली गुंतवणूक, तिची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा हा खूप महत्त्वाचा असतो. जर आपण विचार केला तर समाजातील प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
investment plan for girls

investment plan for girls

जर आपण गुंतवणूक योजनांचा विचार केला तर अनेक प्रकारच्या योजना सध्या आहेत. गुंतवणूक योजनांच्या बाबतीत केलेली गुंतवणूक, तिची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा हा खूप महत्त्वाचा असतो. जर आपण विचार केला तर समाजातील प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत.

परंतु त्यातही मुलींसाठी त्यांचे आर्थिक भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी काही योजना खूप महत्वपूर्ण आहेत. जर या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच मुलींचा भविष्यकाळ हा खूप सुरक्षित होऊ शकतो यात शंकाच नाही. या लेखामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Lic Scheme: तुम्हाला मासिक छोट्याशा गुंतवणुकीतून हवा असेल लाखात परतावा तर एलआयसीची 'ही' योजना आहे फायदेशीर

या योजना करतील मुलींचे आर्थिक भविष्य समृद्ध

1- चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड- हा म्युच्युअल फंड खास मुलींसाठी बनवलेला असून याचा लॉकिंग कालावधी हा अठरा वर्षाचा आहे व जास्त कालावधीत या फंडाच्या माध्यमातून मुलींसाठी खास मोठा निधी तयार करता येऊ शकतो.

2- नॅशनल सेविंग सर्टिफिकेट-ही एक पोस्ट ऑफिसचे महत्त्वपूर्ण योजना असून मुलींसाठी खूप महत्त्वाचे आहे. या योजनेमध्ये हमी परतावा मिळतो तसेच सरकार या योजनेवर 7.6 टक्के वार्षिक व्याज देत आहे.

या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवून खाते चालू करता येते व यामध्ये गुंतवणूकीची कमाल मर्यादा नाही. या योजनेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असून यामध्ये तुम्हाला कर सूट देखील मिळते.

नक्की वाचा:पोस्टाच्या सेव्हिंग स्किममधील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; सरकार देणार दसऱ्याची मोठी भेट, होणार फायदाच फायदा

3- युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान(युलीप)- हा प्लॅन देखील मुलींसाठी खूप महत्वपूर्ण गुंतवणुकीसाठी चा पर्याय असून या माध्यमातून विम्याचे संरक्षण तर मिळतेच परंतु पालकांचे निधन झाले तर विमा कंपनी प्रीमियम देखील भरते. पालक यांच्या निधनानंतर संबंधित विमा कंपनी मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलतो आणि तिला एकरकमी रक्कम देखील प्रदान करते.

4- पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम- पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट खाते उघडून मुलीच्या आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. यामध्ये मॅच्युरिटी पिरियड पाच वर्षाचा असतो. परंतु यामध्ये कालावधी वाढवता येऊ शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणे जोखीममुक्त असून त्यावर निश्चित प्रकारचे व्याज देखील मिळते.

नक्की वाचा:E-Shram Card Update: श्रम कार्ड आहे महत्त्वाचे आणि मिळवा 'हे' फायदे, वाचा डिटेल्स

English Summary: this is some important investment scheme for economicaly secure future of girls Published on: 12 October 2022, 05:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters