1. बातम्या

व्यक्ती ते पशुधन; वनप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीला लाखोंची भरपाई

मुंबई- वनप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत झाल्याच्या किंवा मनुष्यहानी झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. शेतकऱ्यांना जीवितहानी सोबत वित्तहानीला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी तसेच पशुधन मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास सरकारी पातळीवरुन अर्थसहाय्य करण्यात येते.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
compansation

compansation

मुंबई- वनप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत झाल्याच्या किंवा मनुष्यहानी   झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. शेतकऱ्यांना जीवितहानी सोबत वित्तहानीला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.  वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी तसेच पशुधन मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास सरकारी पातळीवरुन अर्थसहाय्य करण्यात येते.

आर्थिक मदतीच्या निकषाची संरचना पुढीलप्रमाणे:

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू:

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी:

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीस कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 05 लाख रुपये व व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. तर व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च (खासगी रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्यास 20,000 रुपये प्रति व्यक्ती खर्चमर्यादा) देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

 

पशुधनाची हानी

गाय, म्हैस, बैल या पशुधन मृत्यूप्रसंगी संबंधित मालकाला वनविभागाकडून स्वतंत्र निधी देण्याची तरतूद आहे.

पशुधनाचा मृत्यू:

पशुधनाच्या बाबतीत गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास चालू बाजारभावाच्या 75 टक्के किंवा कमाल 40,000 रुपये यापैकी कमी असणाऱ्या रकमेचे अर्थसहाय्य प्रदान  केले जाते.

मेंढी, बकरी किंवा तत्सम पशुधन दगावल्यास चालू बाजारभावाच्या 75 टक्के किंवा कमाल 10,000 रुपये यापैकी कमी असणाऱ्या रकमेचे अर्थसहाय्य प्रदान केले जाते.

पशुधन जखमी:

गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास चालू बाजारभावाच्या 50 टक्के किंवा कमाल 12,000 रुपये यापैकी कमी असणारी रक्कम, गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी किंवा तत्सम पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी खर्च म्हणून संबंधितांना प्रति जनावर कमाल 4000 रुपये अर्थसहाय्य देण्याचे या सरकारी निर्णयामध्ये निश्चित करण्यात आले आहे.

तीन लाखांची मदत तत्काळ

वनप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यामुळे वारसांना तातडीची मदत म्हणून 3 लाख रुपयांचा धनादेश तत्काळ वितरित केला जाणार आहे. तर उर्वरित 7 लाख रक्कम संबंधितांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून स्वीकारले जाणार आहेत. 

वन्यप्राण्यांपासून पिकांच्या व फळझाडांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल देण्यात येणाऱ्या सरकारी अर्थसहाय्य रक्कमेबाबत देखील स्वतंत्र स्वरुपाची तरतूद आहे.

अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती :

पिक नुकसानीची तक्रार अधिकारक्षेत्र असलेले नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसात करावी. त्याची शहानिशा करून संबंधित वनपाल, सरपंच, ग्रामसेवक/तलाठी व कृषी अधिकारी या चार सदस्यांच्या समितीमार्फत पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे, या बाबी पार पडल्या जातील. मदत प्रती हेक्टरी न राहता प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीवर अवलंबून राहिल.

English Summary: goverment compansation for wild animal attack Published on: 19 September 2021, 01:15 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters