नाशिक येथे विलोवुड तर्फे आयोजित द्राक्ष चर्चासत्रास उस्फुर्त प्रतिसाद

Tuesday, 02 October 2018 08:32 AM


नाशिक व पिंपळगाव बसवंत येथे जागतिक दर्ज्याची विलोवुड कंपनीच्या वतीने दिनांक 29 व 30 सप्टेंबर 2018 रोजी द्राक्ष पिकावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यास द्राक्ष बागायतदार शेतकरी बंधूनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. द्राक्ष पिकात येत असलेल्या अडचणी कीड व रोग आणि सध्याचा बदलत्या वातावरणाचा द्राक्ष पिकावर होणारा विपरीत परिणाम या समस्यावर या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून विलोवुड कंपनीचे श्री. विवेक रस्तोगी (डी जी एम मार्केटिंग), झोनल मॅनेजर श्री. चंद्रकांत डुमरे, रिजनल मॅनेजर दीपक चिंचवडे पुणे विभाग व ईश्वर पाटील, ओंकार दिग्रसकर, हे उपस्थित होते.

विवेक रस्तोगी यांनी विलोवुड कंपनीची आत्तापर्यंत ची वाटचाल, GLP लॅब आणि कंपनीचे पेटेंटेड उत्पादने याबद्दल उपस्थिताना सखोल माहिती दिली. चंद्रकांत डुमरे यांनी द्राक्ष बागेतील जमिनीची बिघडत असेलला पोत त्याचे द्राक्ष पिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करावयाची उपयायोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ईश्वर पाटील यांनी उपस्थित द्राक्ष बागायतदारांना प्रामुख्याने यात द्राक्ष पिकात होणारी मणीगळ, घड जीरणे, उडद्या भुंगेरे व मिलीबग, डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण यावर विलोवुड कंपनीचे उत्पादने वापरून प्रभावी नियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. दीपक चिंचवाडे यांनी फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले व काही सुरक्षा कीटचे वितरण केले.

कार्यक्रमाच्या शेवटी द्राक्ष बागायतदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उपस्थित तज्ञांनी उत्तरे देवून प्रश्नांचे निरसन केले. सदर चर्चासत्रास नाशिक व पिंपळगाव बसवंत भागातील 500 द्राक्ष बागायतदार उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन श्री. विलास लोढे आणि सूत्रसंचालन ओंकार दिग्रसकर यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासठी मयूर जेऊघाले व टीमने अथक परिश्रम घेतले.

Willowood विलोवुड grape द्राक्ष Downy mildew डाऊनी मिल्ड्यू

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.