कोरोना महामारी मध्ये सर्व जग ठप्प असताना जर कुठले क्षेत्र टिकून राहिले असेल तर ते म्हणजे कृषिक्षेत्र. भारताची अर्थव्यवस्था तशी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असताना कोरूना मारी देखील भारतीय कृषी क्षेत्राने दमदार कामगिरी केली
या अवघड कालावधीमध्ये सुद्धा भारतीय सेंद्रिय शेतीचा विचार केला तर सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर 2020 आणि 21 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर भारताने साडेआठ मेट्रिक टनांपेक्षा जास्त सेंद्रिय उत्पादने निर्यात केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रियारंजन यांनी दिली आहे. दुबईतील एक्सपो 2020 मध्ये केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे अन्न, कृषी आणि उपजीविका पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय सेंद्रिय उत्पादन आणि मूल्य साखळी या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात प्रियारंजन बोलत होत्या. कृषी क्षेत्रासमोर ज्या काही समस्या आहेत त्यावर मात करून भारतीय शेतकऱ्यांनी केलेल्या सेंद्रिय उत्पादनाची कामगिरी ही कौतुकास्पद अशी आहे मृदा पाणी तसेच 15 प्रकारचे शेती हवामान क्षेत्र आणि अनेक वैविध्यता सह भारतात शेतकरी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वाटचाल करत आहेत. जर फलोत्पादन क्षेत्रांमधील भारताची वाटचाल पाहिली तर भारत हा जगातील खाद्य कोठार बनेल
असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पि.के.स्वैनयांनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतातील थेट परकीय गुंतवणूक सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये भारताच्या सेंद्रिय उत्पादनांचीस्वीकारहर्ता वाढविण्यासाठी विशेष असा कृती कार्यक्रम देखील राबवण्याची गरज केंद्रीय कृषी सचिव डॉ.बी राजेंद्र यांनी व्यक्त केली.
Share your comments