कांदा म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो नाशिक जिल्हा, याचे कारण असे की नाशिक जिल्ह्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. द्राक्ष पिकासमवेत नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी देखील ओळखला जातो. नाशिक द्राक्ष पंढरी तसेच कांद्याचे आगार म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे. आता नाशिक जिल्ह्यातूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे संपूर्ण आठवडाभर कांद्याची विक्रमी आवक होत असताना देखील कांद्याचे दर टिकून राहिलेत त्यामुळे तालुक्यात समवेतच संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे अंदरसुल उपबाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा खरीप हंगामातील लाल कांदा आहे. या संपूर्ण आठवड्यात लाल कांद्याची येवला एपीएमसी व उपबाजारात दर्जेदार आवक नमूद करण्यात आली. आवक जरी जास्त होती तरी देखील कांद्याला मिळत असलेला बाजार भाव समाधानकारक असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बाजारभावात मामुली बढत देखील या हप्त्यात नमूद करण्यात आली. तज्ञांच्या मते, विदेशात कांद्याची मागणी वाढली असल्याने देशांतर्गत येणाऱ्या सर्व बाजारपेठेत याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे. येवला एपीएमसी व या अंतर्गत येणाऱ्या उपबाजारात आठवडाभर तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर टिकून राहिले होते. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात या संपूर्ण आठवड्यात सुमारे 62 हजार क्विंटल ची दर्जेदार आवक नमूद करण्यात आली आहे.
संपूर्ण सप्ताहात लाल कांदा बाजारपेठेत दाखल होत होता. लाल कांद्याला मुख्य आवारात जास्तीत जास्त 3061 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर प्राप्त झाला, तर कमीत कमी दर 500 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. असे असले तरी मुख्य आवारात संपूर्ण सप्ताहभर सरासरी बाजारभाव 2550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कायम राहिल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तर दुसरीकडे येवला एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या अंदरसुल उप बाजाराच्या आवारात लाल कांद्याची सुमारे साडे 25 हजार क्विंटल एवढी विक्रमी आवक बघायला मिळाली. मुख्य बाजार समितीपेक्षा उपबाजारात लाल कांद्याची आवक कमी होती.
मात्र असे असले तरी, उपबाजारात संपूर्ण सप्ताहभर झालेली आवक विक्रमी असल्याचे बाजार समिती प्रशासनाद्वारे सांगितले गेले. उपबाजार समितीत देखील कांद्याचे जास्तीत जास्त भाव 3 हजार 60 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते तर कमीत कमी दर 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता, या बाजार समितीत देखील कांद्याचे सरासरी दर 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. येवला एपीएमसी व त्या अंतर्गत येणाऱ्या उपबाजार समितीत संपूर्ण सप्ताहभर समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाल्याने परिसरातील शेतकरी सुखावला असल्याचे चित्र या वेळी बघायला मिळाले.
Share your comments