सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Solapur Agricultural Produce Market Committee) देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या (Maharashtra) शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याच्या भावना कृषी क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या देशातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठांत गेल्या आठवड्यापासून आवक मंदावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाले असल्याचे समजत आहे. काल शनिवारी बाजार समितीत फक्त 357 ट्रक कांद्याची आवक नमूद करण्यात आली, यामुळे कांद्याच्या दरात (Onion prices) तब्बल 600 रुपयांनी घसघशीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
जानेवारी (January) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजार समितीत दमदार आवक होत होती, जानेवारी महिन्याच्या 10 तारखेपासून पुढे वीस दिवस बाजार समितीत विक्रमी आवक नोंदविण्यात आली. त्यावेळी बाजारपेठेत रोजाना एक हजार ट्रक कांद्याची आवक होत होती. बाजार समितीत तेव्हा 1000 रुपये प्रतिक्विंटल ते 2000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान कांद्याचे भाव स्थिरावले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून बाजारपेठेतील चित्र कमालीचे पालटले आहे सध्या बाजारपेठेत कांदा आवक मध्ये घसरण नमूद करण्यात येत आहे. गुरुवारी बाजारपेठेत मात्र 150 गाडी कांद्याची आवक झाली.
आवक कमी झाली की बाजारभावात वाढ होते हे बाजारपेठेतील गणित आहे बाजारपेठेतील या गणितानुसारच सध्या सोलापूर बाजार समिती कांद्याचे दर वाढले आहेत. गुरुवारी तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत समाधान कारक बाजार भाव मिळत होते. शनिवारी कांद्याची आवक गुरुवारी पेक्षा थोडीशी वाढली या दिवशी जवळपास 357 ट्रक कांद्याची आवक झाली. शनिवारी कांद्याच्या आवकेत मामुली बढत झाली आणि दरातही 300 रुपयांनी वाढ झाली. या दिवशी बाजारपेठेतकांद्याला जास्तीत जास्त 3300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असा दर मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासमवेतच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे, राज्यातील इतर जिल्ह्यातुनही बाजारपेठेत कांद्याची आवक होत आहे. सध्या मिळत असलेला कांद्याचा दर समाधान कारक असल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
Share your comments