सोलापूर
कांद्याचे दर (Onion Rate) घसरल्यामुळे सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत कांदा विक्री केलेल्या ४६ हजार ९० शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते.
सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार २०४ शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी १०१ कोटी १६ लाख रुपये लागणार आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार कार्यवाही अपेक्षित आहे.
यंदा जानेवारी महिन्यात कांदा उत्पादकांना एकदम कमी दरात कांदा विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांना कांदा विकून पदर भांड्याचे पैसे द्यावे लागले. काही शेतकऱ्यांना कांदा विक्री केल्यानंतर फक्त २ रुपये मिळाले. याबाबतचे तेव्हा फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले.
तेव्हाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नाही पण अनुदान लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दरम्यान कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. अनुदानाचा निर्णय सरकारने २२ मार्च रोजी घेतला आणि ३१ मार्चपर्यंत प्रचंड आवक बाजार समित्यांमध्ये झाली.
Share your comments