Pm Kisan Yojna| केंद्र सरकारने शेतकर्यांच्या कल्याणापित्यर्थ पीएम किसान सम्मान निधि योजना संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये, दोन हजारांच्या तीन हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना सुमारे 10हफ्ते देण्यात आले आहेत. एप्रिल मध्ये या योजनेचा अकरावा हफ्ता दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र या योजनेचा अकरावा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आज आपण या योजनेसाठी मोबाईलद्वारे ई-केवायसी कशी करायची याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी. या योजनेसाठी ई-केवायसी 31 मार्च 2022 पर्यंत करावी लागणार आहे अन्यथा या योजनेचा अकरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार नाही.
ई-केवायसी करण्यासाठी आपणास https://pmkisan.gov.in/ या पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे अनिवार्य राहणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथे आधार क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल, तिथे आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP टाका. एवढे केल्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होईल. मात्र जर केवायसी झाली नाही तर तिथे इनव्हॅलिड म्हणुन एक नोटिफिकेशन येईल. मोबाईल द्वारे ई-केवायसी करता आली नाही तर मग मात्र आपणास आपले सेवा केंद्र अर्थात सीएससी सेंटर गाठावे लागेल.
हेही वाचा:-
नौकरीने मारलं पण काळ्या आईने तारलं! बेरोजगार झालेला युवक आता शेतीतून प्राप्त करतोय लाखोंची कमाई
गजब! फक्त वीस गुंठ्यात 'या' शेतकऱ्याने मिरची लागवड करून कमविले सात लाख रुपये
'या' जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाली खत टंचाई; रासायनिक खते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
Share your comments