1. बातम्या

वर्ध्यातील पशुपालकांसाठी खुशखबर; अनुदानावर मिळणार गाई- म्हशी

वर्धा : देशात मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय केला जातो.  उत्पन्न वाढीसाठी पशुपालन जबरदस्त व्यवसाय आहे. देशात १८७.७५ मिलियन टन इतके प्रमाणात दुधाचे उत्पादन होते.  यात अजून वाढ व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान राज्यातील वर्धा जिल्ह्यातील  पशुसंवर्धन विभागामार्फत अनोखी योजना राबवली जात असल्याने पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे.

वर्धा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकाची लागवडीसाठी अनुदान, दुधाळ जनावरांचे अनुदानावर वाटप आणि प्रशिक्षण योजना अशा विविध योजना राबविण्यात येणार आहेत.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी ३१ ऑगस्टपर्यंत संबधित पंचायत समितीत अर्ज करावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाने- गुल्हाने यांनी केले आहे.

दरम्यान अनुसूचित जाती आणि आदिवासी समाजाच्या शेतकरी व पशुपालकांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याकरिता ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे (गाई-म्हशी) वाटप करण्यात येणार आहे.  पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण ही योजना केवळ अनुसूचित जातीच्या शेतकरी पशुपालकांकरिता १०० टक्के अनुदानावर ३ दिवसासाठी मोफत प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादन वाढीसाठी व तसेच भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बहुवार्षिक वैरण पिकांची लागवड करण्याकरिता प्रती लाभार्थी १ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे यांचे वितरणही पशुपालकांना करण्यात येणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters