1. बातम्या

क्रेडिट कार्डने कर्ज घेणाऱ्यांसाठी खूशखबर ; नाही द्यावा लागणार ईएमआय

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे अनेक कामे थांबल्याने अनेकांच्या हातातील चलनाला ब्रेक लागला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने काही दिलासादायक निर्णय घेतले आहेत. नोकरदार वर्गासह शेतकऱ्यांसाठीही सरकारने अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सर्व पीक कर्जावरील ईएमआय हफ्ते थांबविण्याचे निर्देश सरकारने बँकांना दिले आहेत. किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी पीक कर्ज घेत असतात. या कार्ड द्वारे कर्ज घेणाऱ्यासाठी सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे.

या कार्डच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, ते या कर्जाचा हफ्ता ३१ मे पर्यंत जमा करु शकतील. यासह कर्ज फेडताना बँक शेतकऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचे व्याज घेणार नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस आणि आता कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे बळीराजावरील संकट अधिक झाले आहे. लॉकडाऊनचा शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी मार्केट बंद असल्याने आपल्या शेतमालाची वाहतूक करता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठऱेल. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल यात शंका नाही. दरम्यान कृषीशी संबंधित व्यापार चालू राहतील असा आदेश राज्य सरकाराकडून देण्यात आले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहेत. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही दीड लाख रुपयांचा कर्ज विना तारण घेऊ शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters