शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सरकार शेतीकडे देणार अधिक लक्ष

14 August 2020 03:56 PM


पुणे : फक्त कृषिक्षेत्र  कोरोना नंतरच्या  काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवू शकते हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतीकडे लक्ष दिल्यास ग्रामीण भागात अधिकची मागणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे अर्तव्यवस्थेला चालना मिळू शकते हे गणित  सरकारच्या  लक्षात आले  आहे.  म्हणून शेतीकडे  सरकार अधिक लक्ष देणार   असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी  म्हटले आहे कि, पंतप्रधान मोदी यांना  २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे शेतीकडे अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. नुकताच सरकारने १ लाख कोटींच्या कृषी विकास निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागच्या काही महिन्यात आपण पहिले असता आपल्याला दिसून येते केवळ  कृषी क्षेत्रात मागणी आहे.

मागच्या दोन महिन्यात ट्रॅक्टर, खते यांची मागणी वाढली आहे. जे शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास ग्रामीण भागात  सर्वच मालाची मागणी वाढेल. कोरोनामुळे शहरी भागाला मर्यादा आल्या आहेत. शहरी अर्थचक्रे पुढे सरकारलाअजून वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकार शेतीकडे  अधिक लक्ष  देणार आणि  गुंतवणूक  करणार आहे.

government central government agriculture ग्रामीण अर्थव्यवस्था rural economy निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman
English Summary: Good news for farmers, the government will pay more attention to agriculture

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.