पुणे : फक्त कृषिक्षेत्र कोरोना नंतरच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवू शकते हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतीकडे लक्ष दिल्यास ग्रामीण भागात अधिकची मागणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे अर्तव्यवस्थेला चालना मिळू शकते हे गणित सरकारच्या लक्षात आले आहे. म्हणून शेतीकडे सरकार अधिक लक्ष देणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे कि, पंतप्रधान मोदी यांना २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. त्यामुळे शेतीकडे अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. नुकताच सरकारने १ लाख कोटींच्या कृषी विकास निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागच्या काही महिन्यात आपण पहिले असता आपल्याला दिसून येते केवळ कृषी क्षेत्रात मागणी आहे.
मागच्या दोन महिन्यात ट्रॅक्टर, खते यांची मागणी वाढली आहे. जे शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास ग्रामीण भागात सर्वच मालाची मागणी वाढेल. कोरोनामुळे शहरी भागाला मर्यादा आल्या आहेत. शहरी अर्थचक्रे पुढे सरकारलाअजून वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकार शेतीकडे अधिक लक्ष देणार आणि गुंतवणूक करणार आहे.
Share your comments