नांदेड
शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन वाढवण्यासाठी मातीपरिक्षण आणि पाणी परिक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने नांदेडमधील शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी परिक्षण मोफत करुन देण्याची सोय उपलब्ध केली आहे. तसंच नांदेडमधील मोंढा बाजार समिती परिसरात कोरोमंडलकडून लॅब देखील सुरु करण्यात आली आहे.
यामुळे परिसरातील आणि कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मातीचा नमुना आणला तर त्यांना मातीची तपासणी मोफत करुन दिली जात आहे. तसंच जमिनीतील घटकांचा अहवाल तयार करुन दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील उत्पादनासाठी मातीचा परिक्षणाचा फायदा होत आहे.
तसंच कोरोमंडलने मातीबाबत दिलेल्या शिफारशीनुसार खतांचा मात्रा देऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यास मदत होऊ लागली आहे.अशी माहिती ग्रोमोर कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनी मातीपरिक्षण विभागाचे इनचार्ज अनिल चव्हाण यांनी कृषी जागरण प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.
माती पाणी परिक्षण का करावे?
शेतातील मातीची सुपीकता आणि गुणधर्म तपासण्यासाठी माती परिक्षण करावे. याचबरोबर चांगले पीक उत्पादन मिळण्यासाठी माती सुदृद्ढ आहे किंवा आजारी आहे हे समजण्यासाठी परिक्षण करणे गरजेचे असते.
तसंच परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याबाबत सुस्पष्टता असणे आवश्यक आहे. काही शेतकरी दरवर्षी मातीचा नमुना अत्यंत काळजीपूर्वक घेऊन तो माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना फायदा होतो.
Share your comments