1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पहिल्याच दिवशी कापसाला मिळाला 11 हजारांचा भाव

कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण भागात दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला व्यापऱ्यांकडून प्रारंभ करण्यात येतो. त्यामुळे यावेळी कापसाला किती भाव मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र दर जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
11 thousand

11 thousand

कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण भागात दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला व्यापऱ्यांकडून प्रारंभ करण्यात येतो. त्यामुळे यावेळी कापसाला किती भाव (What price cotton) मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र दर जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सध्या सणासुदीच्या काळात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस उत्पादक (Cotton Growers) शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला.

सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

यावेळी साधारण कापसाला (Cotton) 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजया दशमीच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ

पैठण तालुक्यात मिळतोय इतका भाव

सिल्लोड (Sillod) प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. तर विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला.

याठिकाणी सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात या भागात 10 हजाराहून अधिक भाव कपाशीला मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या 
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ; मिळणार २० लाख रुपयांची मदत
'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...

English Summary: Good news farmers first day cotton fetched price 11 thousand Published on: 06 October 2022, 03:12 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters