सध्या अवकाळी पाऊस आणि आपत्कालीन संकंटांमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. त्यातल्या त्यात फळबागांवर याचा गंभीर परिणाम झाला. असं असलं तरी आता आपल्या सगळ्यांना हापूस आंब्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. फळांचा राजा आता बाजारपेठेत पोहचला. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आंब्याचा आस्वाद घेता येणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हापूस आंबा आता मुंबई, पुणे यासारख्या बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे.
कोकण आणि अन्य राज्यातून जवळपास 6 लाख 29 हजार 237 पेट्या या मुंबई बाजार समितीमध्ये दाखल झाल्या आहेत. हापूस आंब्याची सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या आंब्याने सध्या अक्षय तृतीये च्या मुहूर्तावर आगमन केले असल्याने त्याचे दर चढेच राहणार आहेत. या मुहूर्तानंतर आंब्याच्या दरात घट होऊ शकते असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरी वातारणामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तर कित्येकांची फळगळ झाली. शिवाय पावसामुळे आंबे डागलतील अशी भीती देखील होती मात्र हापूस आंब्याने या सगळ्या अडचणींचा डोंगर पार केला आहे. आता आंबे बाजारपेठेत पोहचले आहेत. अक्षय तृतीयेला आंब्याची मोठी मागणी असते. राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये या फळाची आवक तर वाढली आहेच सोबत दरही वाढले आहेत. सध्या हापूसची पेटी 800 ते 2 हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे.
आंबा उत्पादक संघाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत आंब्याची आवक वाढली आहे. आणि यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील हापूस आंबा दाखल झाला आहे. फक्त कोकणी विभागातून शनिवारी मुंबई बाजारपेठेत 88 हजार 494 हापूसच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. सध्या आंब्याला मागणी जास्त असल्यामुळे त्याचे दर देखील जास्त आहेत असं असताना आंबा खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही.
आंब्याला मिळत असलेला दर बघून आंबा उत्पादक समाधानी आहेत.अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे उत्पादक आंब्याला योग्य दर मिळावा अशी अशा करत होते. अखेर उत्पादकांचा हा उद्देश साध्य होताना दिसत आहे. शेतकरी बंधू शेती करत असताना ते बाजारापर्यंत पोह्चवेपर्यंत सुयोग्य नियोजन हे करतातच. असच नियोजन सध्या आंबा उत्पादकांनी देखील केला. अक्षय तृतीयेला आंबा विक्री करता यावा असे नियोजन उत्पादकांनी केले. त्यानुसार गेल्या आठवड्याभरापासून आंब्याची आवक वाढत गेली. शनिवारी तर तब्बल 88 हजार 414 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
Breaking :ज्वारीच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात घट; वाचा सविस्तर
महिलांसाठी राखीव कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'लक्ष्मी' योजनेत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा- कृषीमंत्री दादाजी भुसे
नवीन वाण विकसित! गोल्डन ॲडव्हान्स हे धानाचे नवीन वाण देईल 55 क्विंटल एकरी उत्पादन
Share your comments