1. बातम्या

चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला प्रतिष्ठित ‘स्कॉच अवार्ड’चे सुवर्णपदक

चंद्रपूर: चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या व कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच पुरस्कारा’च्या सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या केंद्राचे संचालक राहुल पाटील व त्यांच्या संपूर्ण चमूला नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमांमध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीच्या संधी मिळवून दिल्याबद्दल हा ॲवार्ड देण्यात आला आहे.

KJ Staff
KJ Staff


चंद्रपूर:
चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या व कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच पुरस्कारा’च्या सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या केंद्राचे संचालक राहुल पाटील व त्यांच्या संपूर्ण चमूला नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमांमध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीच्या संधी मिळवून दिल्याबद्दल हा ॲवार्ड देण्यात आला आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ, नियोजन व वन खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर बांबू धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे जागतिक दर्जाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. देशातील ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे भूमिपूजन झाले. बघता बघता हा प्रकल्प चंद्रपूर-गडचिरोली व आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र झाले आहे. या केंद्रामुळे देशाच्या ईशान्य कडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रपूरचे व्यावसायिक नाते जोडले गेले आहे. तर या ठिकाणावरुन चीन, जपान व अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक व प्रशिक्षणाची भागीदारी होत आहे.

या केंद्राच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार महिलांना बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यामुळे बांबू पासून वेगवेगळ्या वस्तु तयार करण्याच्या उद्योगाला चालना मिळाली आहे. याशिवाय बांबूपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी विक्री केंद्र उभारली जात आहे. अमेझॉन व अन्य प्रतिष्ठित अशा वस्तू विक्री संस्थांची या केंद्राचा संपर्क आला आहे. बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट हा उपक्रम या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, चंद्रपूर, विसापूर, पोंभुरणासंत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी कार्यरत बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चिचपल्ली, मुल आणि चिमूर याठिकाणी हे युनिट लवकरच कार्यरत होणार आहे.

या ठिकाणी तयार झालेला तिरंगा ध्वज हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात फडकला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत या ठिकाणच्या वस्तू पोहोचल्या आहेत. या केंद्रातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांनाही सुरुवात झाली असून बांबू पासून वस्तू तयार करण्याच्या डिप्लोमाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कौशल्य विकास केंद्राने आपले अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले आहे. आता या कौशल्य विकास व रोजगार निर्मितीच्या केंद्राला राष्ट्रीय मान्यता मिळली असून नुकताच प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्कॉच संस्थेच्या सुवर्णपदकाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.

English Summary: Gold medal of the prestigious Scotch Award for Bambo Research and Training Center in Chandrapur Published on: 24 December 2018, 08:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters