शेतकरी आणि विविध कार्यकारी सोसायटी त्यांचे एक ग्रामीण भागात घनिष्ठ नाते आहे. शेतकऱ्यांना अगदी जवळची आणि शेतीला सहजरीत्या वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून विविध कार्यकारी सोसायट्याकडे पाहिले जाते.
ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या याच नाशिक जिल्ह्यातील 435 विविध कार्यकारी सोसायट्यांना अनिष्ट तफावतीत असल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा बँकेच्या वतीने कर्ज वाटपासाठी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आला होता.
परंतु आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी यासंबंधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. मागच्याच आठवड्यात याबाबत जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँक प्रशासक व प्रशासकीय संचालकांची एकत्रित बैठक घेऊन या अनिष्ट तफावतीत असलेल्या 435 विविध कार्यकारी सोसायटी यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशान्वये जिल्हा बँकेच्या वतीने एक परिपत्रक काढण्यात आले असून, नाशिक जिल्ह्यातील ज्या अनिष्ट तफावत ईतील सोसायटी आहेत अशा सोसायट्यांना सभासदांना कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नक्की वाचा:आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना मोदी सरकार घरबसल्या देणार 6 हजार, जाणुन घ्या याविषयी
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना खरिपाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अनिष्ट तफावत येत असलेल्या 435 संस्था असून एकट्या येवला तालुक्यात 23 संस्था आहेत.
या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत जिल्हा बँकेने अनिष्ट तफावत येथील सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय मागे घेऊन नियमित करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत एक बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील अनिष्ट तफावत येथील सोसायट्यांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व अधिकार्यांची एकत्रित बैठक घेऊन कर्ज पुरवठा नियमित करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नाशिक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढले असून अटी आणि शर्ती यांची पूर्तता करून सभासदांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नक्की वाचा:ठरलं तर! पीक विम्यासाठी सरकार देतयं 80 कोटी 36 लाखांचा निधी; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
पाळाव्या लागतील या अटी-शर्ती
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात काही अटी व शर्ती बंधनकारक केले आहेत.
त्यानुसार 2022-23 हंगामात 31 मार्च च्या अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावत यांच्या रकमेपैकी 30 सप्टेंबर अखेर 25 टक्के व 31 मार्च 2023 अखेर किमान 50% अनिष्ट तफावत इतकी रक्कम कमी करण्याचे संस्थेवर बंधनकारक राहील.
31 मार्च 2022 अखेरीस असलेल्या अनिष्ट तफावतीचा रकमेत यापुढे वाढ होणार नाही याची दक्षता घेऊन कामकाज करावे. जिल्हा बँकेने सुचित केल्यानुसार कर्ज खाते व्यवहार करावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनिष्ट तफावती तील पात्र सभासदांनाच पिक कर्ज वितरण करावे. अशा पद्धतीच्या अटी ठेवण्यात आले आहेत.
नक्की वाचा:खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची लूट; कृषी विभागाने खत विक्रेत्यांना दिला मोठा दणका
Share your comments