कमी भांडवलात मिळवा जास्त नफा; चिप्सच्या उद्योगातून होईल भरभराट

17 February 2021 04:47 PM By: भरत भास्कर जाधव
बनाना चिप्स उद्योग

बनाना चिप्स उद्योग

कोरोना काळात नोकरी गेल्याने अनेकजण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसायाच्या शोधात लोक आहेत. दरम्यान या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. अनेकांना अतिरिक्त उत्पन्नाची देखील अपेक्षा असते. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीत-जास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

अनेक मोठ्या कंपन्या केळ्याचे चिप्स (Banana Chips) बनवत नाहीत. यामुळे तुम्ही याच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. उपवासामध्ये बटाट्याच्या चिप्सबरोबर केळ्याच्या चिप्सला देखील मोठी मागणी असते. केळ्याच्या चिप्सचे मार्केट खूप छोटे असल्याने तुम्ही मार्केटमध्ये तुमचा ब्रँड तयार करून मोठा नफा मिळवू शकतात.

हेही वाचा : काजू प्रक्रिया उद्योगातून मिळेल बक्कळ नफा

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठीचे साहित्य -

केळ्याचे चिप्स  तयार करण्यासाठी प्रामुख्याने कच्ची केळी, तेल, मीठ, मसाले या साहित्याची गरज असते. याचबरोबर विविध प्रकारच्या मशीन देखील गरजेच्या आहेत. या मशीनची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केळ्याचे चिप्स  तयार करण्यासाठी केळ्याचे साल काढणारी मशीन, केळ्याचे काप करणारी मशीन, तळणारी मशीन, मसाले एकत्र करणारी आणि पॅकिंग करणाऱ्या मशीनची गरज आहे.

 

कुठे मिळतील मशीन्स  -

या मशीनची किंमत 28 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी तुम्हाला 4 ते 5 गुंठ्यांची जागा गरजेची आहे. india.alibaba.com/index.html या वेबसाइटवरून तुम्ही या मशीनची खरेदी करू शकता.

50 किलो चिप्स बनवण्याचा खर्च -

50 किलो चिप्स तयार करण्यासाठी 120 किलो कच्च्या केळ्यांची आवश्यकता आहे. यासाठी 1 हजार रुपये खर्च येईल. याचबरोबर 12 ते 15 लिटर तेलासाठी 1050 रुपये खर्च करावे लागतील. याचबरोबर मशीनसाठी सरासरी 10 ते 11 लिटर डिझेलची गरज आहे. यामध्ये 900 रुपये खर्च होणार आहेत. याचबरोबर मीठ मसाल्यासाठी 150 रुपयांचा खर्च होणार आहे. हा सर्व खर्च 3200 रुपये होणार आहे. यामध्ये सर्व खर्च मिळून 1 किलो चिप्स 70 रुपयांत तयार होणार आहेत. बाजारात 90 ते 100 रुपये प्रतिकिलो विक्री करून तुम्ही यामधून नफा मिळवू शकता.

 

सर्वसाधारणपणे 1 किलो चिप्सच्या विक्रीवर 10 रुपये नफा गृहीत धरला तर तुम्ही साधारणपणे दिवसाला 4 हजार रुपयांची कमाई करू शकता. महिन्याला 25 दिवस तुमचा व्यवसाय सुरू राहिल्यास महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करू शकता.

chips business केळीचे चिप्स चिप्सचा उद्योग कोरोना corona
English Summary: Get more profit with less capital; earn more money from chips business

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.