काजू प्रक्रिया उद्योगातून मिळेल बक्कळ नफा

25 August 2020 09:11 PM


भारतामध्ये महाराष्ट्र, केरळ,  आंध्र प्रदेश, ओरिसा, गोवा इत्यादी राज्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यात महाराष्ट्राचा देशातील काजू उत्पादनाच्या बाबतीत अव्वल क्रमांक आहे. महाराष्ट्रा मध्ये प्रमुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, तसेच महाराष्ट्रातील काजू ला परदेशात फार मोठी मागणी आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात आलेली आहे.  भारतात मोठ्या प्रमाणावर काजू प्रक्रिया करणारे कारखाने आहेत.  परंतु महाराष्ट्रामध्ये एकूण उत्पादनाच्या फक्त पंचवीस टक्के काजू बीवर प्रक्रिया केली जाते व बाकीच्या काजूची निर्यात केली जाते.  जर महाराष्ट्रामध्ये काजूप्रक्रिया उद्योगाला जास्ती-जास्त चालना दिली तर त्यामधून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते. थोडक्यात काजू प्रक्रिया उद्योगाची माहिती या लेखात घेऊ.

   काजू प्रक्रिया उद्योग

 सर्वसामान्यपणे प्राथमिक रित्या झाडावरून पडलेले काजू गोळा करण्यात येतात. त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन व्यवस्थितपणे साफ करतात.  पाण्यामध्ये चार ते पाच दिवस वाळवत ठेवले जाते.  नंतर काजू बी  90 ते 100 सेंटिग्रेड तापमानात 45 मिनिटे बॉयलरमध्ये उकळून घेतात. तसेच त्यानंतर बिया बारा तास ड्रायरमध्ये सावलीत वाळवतात.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी काजूबी कटर मशीनद्वारे फोडतात व बियांची टरफले काढून त्यांना सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर काजूगराच्या  आकारमानानुसार वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग केले जाते.

 

काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी

  • ड्रायर- ओव्हनमध्ये ब्लोअर व फॅनचा वापर करून गरम हवा सर्वत्र सारखी खेळवली जाते. त्यामुळे काजूगर व्यवस्थित भाजले जाण्यास मदत होते.
  • बाष्पक- बाष्पकमध्ये असलेल्या स्टीम पाईपमुळे वाफ  लवकर तयार होते. तयार झालेली वाफ काजू ठेवलेल्या भांड्यामध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणात खेळवली जाते. त्यामुळे काजूबिया लवकर शिजून होतात. लाकूड,  केरोसीन,  गॅस इत्यादी इंधन म्हणून या मशीनमध्ये उपयोग करता येतो.
  • कटर मशीन- काजू बी फोडण्यासाठी साधारणपणे हाताचा व पायाचा उपयोग करता येणाऱ्या मशिनरीचा उपयोग करण्यात येतो. कटर मशीनमध्ये मशीन वर उभे राहून अथवा बसून काजू बी फोडता येते.
  • स्टीम सेपरेटर= या मशिनच्या साह्याने वाफ वेगळी केली जाते. त्या मुळे काजू गराचा  रंग स्वच्छ, पांढरा होतो.
  • ह्युमिडिटी चेंबर= काजू गराचा तुकडा होऊ नये म्हणून पॅकिंग च्या आधी पाण्याची वाफेचे मात्र देण्यासाठी या मशीन चा उपयोग होतो.

 जर शेतकऱ्यांनी काजू प्रक्रिया उद्योगाचा व्यवस्थित अभ्यास करून व प्रशिक्षण घेऊन जर सुरुवात केली तर चांगल्याप्रकारे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. साधारणपणे एक किलो काजू बिया पासून अडीशे तीनशे काजुगर मिळत असल्याने 50 किलो काजू बियांपासून दररोज पंधरा किलो काजू गर मिळतो. 190 रुपये प्रतिकिलो दराने 2850 रुपये उत्पन्न मिळते. जर आपण विचार केला तर सगळा खर्च वजा जाता वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.

          संदर्भ स्त्रोत- विकिपीडिया

Cashew Processing cashew processing industry काजू प्रक्रिया Processing industry प्रक्रिया उद्योग
English Summary: Huge profits from cashew processing industry

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.