या वर्षी राज्यात उसाचे विक्रमी गाळप झाले असून जवळजवळ आत्तापर्यंत 1312 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप करण्यात आले आहे.
अजूनही राज्यांमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न शिल्लक आहेच. परंतुहा 19 लाख टनांच्या आसपासशिल्लक उसाचे देखील नियोजन करण्यात येत असून काही दिवसात तोसुद्धा पूर्णतः गाळप केला जाईल. या सगळ्या धामधुमीत विक्रमी गाळप झाल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी पोटी मिळणारी रक्कम 42 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबतसाखर आयुक्तालयाने म्हटले की शेतकऱ्यांनायावर्षी मिळणारा रास्त व किफायतशीर दर विक्रम स्वरूपाचा राहील व एफआरपी थकीत करण्याचे प्रमाण देखील खूप कमी राहिल.अजून पर्यंत बराचसा ऊस गाळपास उभा असल्याने त्यासाठी अनेक प्रकारच्या प्रशासन स्तरावरउपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना हार्वेस्टर अधिग्रहित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतेक ऊस गाळप केला जाईल. परंतु महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही हो शिल्लक राहिला तर जूनच्या पहिल्या आठवड्यातकारखाने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी राज्याने इथेनॉल निर्मिती मध्ये देखील चांगलीच झेप घेतली असून यावर्षी इथेनॉल उद्योगाची उलाढाल नऊ हजार कोटींच्याआसपास आहे. कालांतराने पुढील हंगामात ते बारा हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर राज्यामध्ये ऊसाची तोडणी व वाहतुकीसाठी 7000 कोटी रुपये वाटले जाणार आहेत.
महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला टाकले मागे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे जास्त कल
आपल्याला माहित आहे कि साखर उत्पादनांमध्ये उत्तर प्रदेशाची मक्तेदारी पाहायला मिळायची.परंतु यावर्षी सर्व रेकॉर्ड मोडत आता महाराष्ट्राने आणि विशेष म्हणजे कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी मारली आहे.इतर पिकांच्या तुलनेत काही प्रमाणात कमी कष्टाची शेती आणि हमखास हमी भाव असलेले पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते.
बारा महिन्याचे कालावधीचे पीक असले तरी कोणताही पिकाला हमीभाव नाही त्यामुळे सर्व शेतकरी या पिकाकडे वळला आहे.विशेष म्हणजे याचा आलेख आता वाढतच चालला आहे. ऊस शेतीला इतर पिकांच्या तुलनेत जास्त पाणी लागते.
त्यामुळे सहाजिकच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी ऊस शेतीकडे जास्त प्रमाणात वळले आहेत. तसेचकोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तरसहकाराचे मोठ्या प्रमाणात जाळे जिल्ह्यात पसरले असून 20 पेक्षा जास्त साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत.
तसेच या जिल्ह्यातील साखर कारखाने एफ आर पी पेक्षाही जास्त दर देतात हा सुद्धा एक अनुभव आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments