1. बातम्या

कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरला गणेश , केली दोन टन सेंद्रिय मोसंबीची वाटप

KJ Staff
KJ Staff


सध्या पुर्ण जगाला कोरोना व्हायरसने हतबल केले आहे. दिवसेंदिवस या विषाणूच्या विळख्यात हजारो लोक अडकत आहेत.  कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यावरही परिणाम झाला आहे.  दरम्यान डॉक्टरांना या लढाईत बळीराजाची साथ मिळाली आहे.  देशातील जनतेला अन्न पुविण्याचे काम बळीराजा करत आहे.  दरम्यान औरंगाबादमध्ये असाच एक योद्धा आहे जो कोविड-१९ च्या लढाईत नागरिकांचा विजय व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला बाधा करत असतो. सध्या तरी यावर कोणत्याच प्रकारचे उपचार नाहीत. यामुळे डॉक्टरही नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास सांगत आहेत. यासाठी औरंगाबादमधील शेतकरी गणेश पवार यांनी औरंगाबाद आणि आजूबाजूच्या परिसरात मोसंबीचे वाटप केले आहे. गणेश पवार यांनी आपल्या शेतात पिकवलेली २ टन सेंद्रिय मोसंबीची वाटप केली असून या मोसंबीची किंमत साधारण १ लाख रुपये आहे.

आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्राध्यापक अक्षय दामकोंडवार आणि अक्षय अग्रवाल आणि प्रभंजन माथोळे यांच्या मदतीने दोन टन मोसंबीची वाटप केली आहे.  घाटी रुग्णालयात आम्ही ५०० किलोग्राम मोसंबी, तर कांचनवाडी येथील रूग्णालयात दैनंदिन मजुरी कामगारांना ५०० किलोग्राम मोसंबीची वाटप केल्याचे गणेश पवार यांनी सांगितले. जवाहर कॉलनीच्या भागात दीडशे डझनचे वाटप करण्यात आले.  तर काही पोलिस अधिकाऱ्यांनाही मोसंबीचे वाटप करण्यात आल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.  गणेश पवार यांनी मॅकेनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नैसर्गिक शेतीविषयीच्या वर्कशॉपनंतर गणेश यांनी आपली नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला.  काही दिवसांपुर्वी गणेशच्या वडिलांना डी अ‍ॅमिलियो व्हिटॅमिन डिफिसीन्सी आजार झाला होता.

हा आजार व्हिटॅमिन कमी झाल्याने उद्भवत असतो. गणेशच्या वडिलांना ६ महिन्यासाठी दवाखान्यात अॅडमिट करावे लागले.  रासाय़निक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या पिकांमुळे आपल्या शररीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे गणेश यांच्या लक्षात आले. महाविद्यालयात टॉपर असलेला गणेशला उत्तम पगाराची नोकरी देखील मिळाली होती. परंतु वडिलांच्या आजारपणांमुळे त्यांना घरी परत यावे लागले. वडिलांच्या आजारपणावर गणेशच्या घरच्यांनी १० लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर गणेश यांनी शेती क्षेत्रात क्रांती करत रासायनिक मुक्त शेतीसाठी काम करण्याचे ठरवले. गणेश यांच्याकडे ३० एकर जमीन आहे. निम्मा जमीनीत ते २५ प्रकारच्या भाज्या आणि ४ ते ५ प्रकारचे फळांचे उत्पादन करतात. इतर अर्ध्या जमीनीत जीवमृत, घनजीवमृत या आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेत शिकवल्या गेलेल्या एन्झाइम्स आणि नैसर्गिक खतांचा वापर करतात.

आडगाव या गावातील २० शेतकऱ्यांना एकत्र आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. एकत्रितपणे ते ४० ते ४५ एकर जागेवर रासायनिक मुक्त फळे आणि भाज्या पिकवत आहेत. त्यांचा हा उपक्रम शेजारील परिसरात खूप लोकप्रिय झाला आहे. मोठ - मोठ्या शहरात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगरुळू मध्ये रासायनिक फळे विकण्याचा गणेश यांचा मानस आहे. विशेष म्हणजे पुढील काही वर्षात युरोपमध्ये ही फळे निर्यात करण्याचा देखील त्यांचा विचार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्राध्यापक अक्षय अग्रवाल यांनी गणेश यांना मार्गदर्शन केले.  युवकांचा नोकरीकडे ओढा असल्याने शेतीकडे कोणी व्यवसाय म्हणून पाहत नाही. गणेश सारख्या तरुणांना ऑर्ट ऑफ लिव्हिंग शेतीमालाला महसूल निर्मितीचे मॉडेल म्हणून स्वीकारण्यास मदत करते.  मी या गणेशला मार्गदर्शन करत आहे. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहे. 'किसान फ्रेश’ नावाच्या कंपनीची नोंदणी करण्यासही आपण मदत केली. या कंपनीमुळे शेतमाल मध्यस्थांकडे न जाता थेट ग्राहकांकडे जाणार असल्याचे अक्षय अग्रवाल म्हणाले.

आमचे खर्च कमी झाले आहेत म्हणून आम्हाला खते आणि कीटकनाशकांवर गुंतवणूक करण्याची गरज नाही. आम्ही सर्व काही स्वतः बनवतो. नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यात आलेल्या मालाला इतर मालांपेक्षा अधिक दर मिळत असतो. ऑर्ट ऑफ लिव्हिंगने आपल्याला बाजारपेठ आणि मार्गदर्शन केल्याबद्दल गणेश त्यांचे आभार मानतो. दरम्यान आपल्या या मोसंबी वाटप उपक्रमाविषयी बोलताना गणेश म्हणाले की, या कोरोना विषाणूमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे ते मरण पावत आहेत. हे मी बातम्यामध्ये पाहतो.  त्यामुळे मी ठरवले की, व्हिटॉमिन सी अधिक असणारे फळे रुग्णालयातील काम करणारे लोक आणि मजुरांना याचे वाटप करायचे. वडिलांच्या आजारपणामुळे गणेशला रात्री झोप येत नाही. स्व:ताची झोप गमावणाऱ्या गणेशने जगाला मदत करण्याची इच्छा दाखवली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters