गतवर्षी अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साखरेचे उत्पादन देखील वाढले आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक उपाय सुचवला आहे. ते म्हणाले, साखर आणि इथेनॉलला चांगले दिवस आले आहेत. असे असताना साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवले पाहीजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. इंधन एवढ्या प्रमाणात आले तर प्रदुषणही वाढेल. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण किती वाढले आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे.
तसेच गडकरी म्हणाले, साखर बनवण्याचा मोह ठेवला तर यावर्षी चांगल मार्केट मिळेल पण पुढील वर्षी फार बेकारी होईल असेही गडकरी यांनी सांगितले आहे. इथेनॉल उत्पादन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला इथेनॉल पंप सुरु करा, पुण्यात तीन स्टेशनच उद्घाटन पंतप्रधान यांनी केले आहे. पण भरायला कोणी येत नसल्याचे गडकरी म्हणाले.
शेतकऱ्यांना आता अन्नदाता नाही तर उर्जादाता बनवायचे आहे. अन्नदाता बनवत राहिलो तर गरीबच राहील असेही गडकरी यावेळी म्हणाले. साखरेचच उत्पादन करत राहीलो तर परिस्थिती वाईट होईल असेही गडकरी म्हणाले. देशातील 186 मतदारसंघात साखर उत्पादनाचा प्रभाव आहे. त्यांना जर आपण चांगला दर दिला नाही तर सरकारालाही ते हालवू शकतात असेही गडकरी यावेळी म्हणाले. याबाबत मोदींशी बोललो असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
संरक्षण विभागातही इथेनॉल वापरण्याच्या संदर्भात माझी चर्चा सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारत सरकारने बांबुपासुन इथेनॉल बनवले आहे, असेही ते म्हणाले. टोयाटो, सुझुकी आणि टाटा या तीन महत्वाच्या कंपन्या आहेत. या तीनही कंपन्या फ्लेक्स इंजिन बनवायला तयार आहेत. जैवइंधन पंप स्टेशन खोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यात तीन स्टेशनच उद्घाटन पंतप्रधान यांनी केले आहे. येणाऱ्या काळात अनेक बदल होणार असून ही एक काळाची गरज आहे. यामध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
वसुली सुरु आहे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, आता मोदी सरकार कशी करणार वसुली, वाचा..
22 मार्च रोजी 'जागतिक जल दिन 2022' निमित्त कृषी जागरणने वेबिनारचे आयोजन, जाणून घ्या काय असेल खास..
'बीडमध्ये तब्बल ४०० एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांनी करायचं तरी काय?'
Share your comments