एफआरपी थकवणं पडलं महागात; ७१ कारखान्यांना परवान्यासाठी पाहावी लागेल वाट

24 October 2020 02:12 PM By: भरत भास्कर जाधव


राज्यातील चालू ऊस गाळप हंगामासाठी १२८ कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत. परंतु ज्या कारखान्यांनी सरकारच्या अटी आणि शर्ती पुर्ण केल्या नाहीत अशा कारखान्यांना अजून परवाना देण्यात आलेले नाहीत.यामुळे या कारखान्यांची परवान्यासाठी धावाधाव होत आहे.किती कारखाने गाळप हंगामात सुरु राहतील कोणते बंद राहतील याची चर्चा सध्या साखर उद्योगात आहे. आतापर्यंत  ८७ खासगी आणि ६१ सहकारी साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

गाळप परवान्यासाठी ११९ कारखान्यांनी  अर्ज केले आहेत.  दरम्यान साखर आयुक्त शेखर गायकवाड सध्या गाळप नियोजनाचा सतत आढावा घेत आहेत.सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि अटींचे पालन करणाऱ्या कारखान्यांना विनाविलंब परवाना देण्याचे धोरण आयुक्तांचे आहे. परवान्यासाठी आयुक्तालयात अर्ज करण्याची गरज राहिलेली नाही. सर्व कागदपत्रे ऑनलाईन मागवील जातात.परवाने वितरणही त्या पद्धतीने होते. मात्र, शासकीय देणी, साखर, कर्ज किंवा थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांचे परवाने सरसकट मंजूर करता येत नाहीत, असे एका प्रादेशिक साखर सहसंचालकांने स्पष्ट केले. दरम्यान ज्या कारखान्यांना परवाने मिळालेले नाहीत त्यांच्या प्रकरणांमध्ये यातील ३० कारखान्यांनी २०१९-२० हंगामातील एफआरपी दिलेली नाही.

याशिवाय २०१८-१९ मधील देणी  थकविलेल्या इतर ११ कारखान्यांचेही परवाने लटकले आहेत. राज्यातील कारखान्यांना गाळपाचा परवाना देताना मागील पाच वर्षांचे गाळप आणि साखर उत्पादन, उपलब्ध उसाचे क्षेत्र यासह आर्थिक कामकाजी माहिती. देणी अशी विविध माहिती  मागविण्यात आली आहे. दरम्यान  १५ ऑक्टोबरपासून हंगाम चालू करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे साखर आयुक्तालयाने गाळप परवाने वाटप प्रक्रिया वेळेत सुरू केली. अर्थात परवाना असूनही कारखान्यांना धुराडी वेळेत पेटवता आलेली नाही. पावसामुळे बहुतेक कारखान्यांच्या बॉयलर प्रदीपनाचे नियोजन ढासळले आहे.  दरम्यान परवान्यासाठी साखर कारखान्यांची मुद्दाम कोंडी करण्याचा हेतू नाही. मात्र, शेतकऱ्यांची  एफआरीप व सरकारी देणी  थकविणाऱ्या  कारखान्यांनी ही देणी कशी चुकती करणार  याविषयीचे लेखी नियोजन द्यावे, असा आग्रह साखर आयुक्तालयाने धरला आहे.  

FRP exhaustion एफआरपी sugar factories साखर कारखाने ऊस गाळप हंगाम गाळप परवाना Threshing season
English Summary: FRP exhaustion cost factories, 71 factories have to wait for license

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.