वस्त्रोद्योग मंत्रालय व वस्त्रोद्योग प्रतीनिधी यांच्यात होणारी(दि.17/01/2022 रोजी)बैठक आज झालीच नाही.आता ही बैठक 31/01/2022 रोजी होणार असल्याचे कळते. दरम्यान कापूस गाठी निर्यातदार चे म्हणने आहे की कापूस दरवाढ हि व्यवसाय चा एक भाग आहे. शेतकरी यांनी अनेक वर्ष मिनिमम सपोर्ट प्राइज(MSP) (किमान आधारभूत किंमत) पेक्षाही कमी रेट ने कापूस विकला आहे.
आता रेट वाढले तर सरकारच्या हस्तक्षेपा ची मागणी उद्योगाने करु नये. तसं पाहता अती पावसामुळे कापूस उत्पादन निम्म्याने घटले आहे . कृषि निविष्ठा चे दर ही वाढले आहेत. त्यामुळे मिळणारं वाढिव रेट योग्य आहेत. शेतकरी यांनीच दरवेळी तडजोड का करावी.उदयोग व ग्राहक यांनी ही जास्तीचे प्रयत्न करावे. एकुणच देशांतर्गत घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत कापुस दरात तेजी कायम राहील.
आप-आपल्या भागात कापूस दर 10000रुपये चे पुढे गेल्यावर शेतकरी यांनी कापूस विक्री सुरू करावी. 20दिवसाचे अंतराने कीमान तीन ते चार टप्पे विक्रीचे करावे. म्हणजे अधिक फायदा होईल.
लेखक-श्री सुभाष पाटिल डूबे मराठवाडा अध्यक्ष ,मी स्वा.शेतकरी ग्रुप महाराष्ट्र (बगर राजकीय संघटन). मोबाईल नंबर--9422961717 विशेष सुचना- कापूस दर हे आमचे नियंत्रण बाहेर ची गोष्ट असल्यामुळे दर विषयी तंतोतंत अंदाज देता येत नाही.
आमचा मेसेज वाचुन कापूस खरेदी-विक्री चा निर्णय करु नये. शेतकरी नी कापूस विक्री चा निर्णय आपली जोखीम घेण्याची पात्रता, अर्थीक परीस्थिती, गरज इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर करावा शेतकरी बांधवांना विनंती किंवा आपल्या भागात योग्य कापूस दर येणे साठी हा मेसेज खूप व्हायरल करावा.
Share your comments