गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची वक्तव्य केली जात आहेत. यामुळे राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
असे असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना, जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप भेट म्हणून दिली जाईल असे पोस्टर पुण्यात बगायला मिळत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सध्या राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या विरोधात शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनो आता सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आता वाढतच जाणार आहे..
पुणे शहरातील अनेक भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून काही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून पक्षाकडून अजूनही संताप व्यक्त होत आहे.
या फ्लेक्सवर जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल. त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन मिळेल, असे यावर लिहिलं आहे.
Crop Insurance: बातमी कामाची! गहू, हरभऱ्याच्या पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत
तसेच खाली टीपही देण्यात आली आहे. सदरची घोषणा कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देण्याकरता नाही. केवळ छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आहे, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या;
कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत
आम आदमीने दिल्ली महापालिकेचे तख्त जिंकले, भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली
मोठी बातमी! पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी उरुळीसाठी नवी नगरपालिका
Share your comments