1. बातम्या

लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ

मुंबई: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 39 लाख घरगुती गॅस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली, त्यापैकी 97 लाख 80 हजार लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित झाली आहेत. लॉकडाऊनच्या काळातही गॅस सिलेंडर्सचे वितरण विना अडथळा सुरु आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 39 लाख घरगुती गॅस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली, त्यापैकी 97 लाख 80 हजार लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित झाली आहेत. लॉकडाऊनच्या काळातही गॅस सिलेंडर्सचे वितरण विना अडथळा सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 कोटी 72 लाख रुपयांची आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

गॅस सिलेंडर्स आणि महिना 5 किलो धान्य मोफत देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील माणसांचे जीवन सुसह्य झालं आहेयामुळे घरातच राहून लॉकडाऊन यशस्वी होण्यास मदत होईल"अशा शब्दात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सावित्री शिवकुमार दिक्षित यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अन्न सुरक्षा, थेट रोख हस्तांतरण, मोफत गॅस सिलेंडर्सचा पुरवठा, महिला ,जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना निवृत्तीवेतन अशा सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मिळत असल्याने उपेक्षित आणि गरीब नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करणे शक्य झाले आहे.

English Summary: free gas cylinder supply under ujjwala yojana helps poor tide over the lockdown period Published on: 16 April 2020, 07:38 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters