MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा - अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या ब्रेकअपचा दुसरा टप्पा सांगितला. आज अप्रवासी मजुर, स्ट्रीट वेंडर, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या ब्रेकअपचा दुसरा टप्पा सांगितला. आज अप्रवासी मजुर, स्ट्रीट वेंडर, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. दरम्यान आज शेतकऱ्यांसाठी फक्त दोन घोषणा करण्यात आल्या परंतु पुढील घोषणा ह्या शेतकऱ्यांसाठी असतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल अशी घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

आम्ही अप्रवासी मजुरों, गरीब आणि गरजुंना डोळ्यासमोर ध्यानात ठेवत आहोत. अप्रवाशी मजूर, गरीब आणि गरजूंना लक्षात घेऊन त्यांना दोन महिन्यासाठी ५ किलो धान्य गरीबांना दिले जाणार आहे. असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. याचा फायदा ८ कोटी प्रवासी मजुरांना होईल. वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही येत्या काळात आम्ही आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. ज्यामुळे उद्या असे काही संकट आले तर गरीबाना देशातल्या कोणत्याही रेशन डेपोमधून धान्य उपलब्ध होऊ शकेल असेही स्पष्ट करण्यात आले.

स्थलांतरित मजुरांची केंद्र सरकारला काळजी आहे. आम्ही त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारली आहेत.  तसेच त्यांच्या तीनवेळच्या जेवणाची सोय केली आहे.  त्यांच्या आरोग्य चिकित्सेचीही सोय केली आहे. स्थलांतरित मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाणार आहे , असे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.  दरम्यान शेतकऱ्यांसाठीही अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या.  शेतकऱ्यांसाठी इंटरेस्ट सब्वेंशन स्कीमला 31 मे पर्यंत सुरू ठेवणार. मार्च-एप्रिलमध्ये 63 लाख कृषी कर्ज देण्यात आले. हे 86 हजार 600 कोटींचे होते.

यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. पिकांच्या खरेदीसाठी राज्यांना दिली जाणारी आर्थिक मदत 6700 कोटी रुपये केंद्र सरकारने वाढवली. ग्रामीण भागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी 4200 कोटी रुपये दिले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत. कुणीही मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरले, असे म्हणू नये असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. लॉकडाउनच्या घोषणेनंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा करण्यात आली. आम्ही सतत नव-नवीन घोषणा करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

English Summary: free food grain to labours for next two months - Finance Minister Published on: 14 May 2020, 07:16 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters